Marathi News> भविष्य
Advertisement

Budh Shani Shubh Yog: बुध-शनीने तयार केला शुभ संयोग; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

Budh Shani Shubh Yog: 18 सप्टेंबर रोजी बुध आणि शनी शुभ संयोग निर्माण झाला आहे. 18 सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. 

Budh Shani Shubh Yog: बुध-शनीने तयार केला शुभ संयोग; 'या' राशींवर बरसणार भरपूर पैसा

Budh Shani Shubh Yog: ज्योतिष शास्त्रामध्ये, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलांमुळे अनेक योग तयार होतात. यातील काही योग शुभ असतात, तर काही योग अशुभ मानले जातात. शुभ योगांचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होताना दिसतो. नुकतंच बुध आणि शनीच्या भेटीमुळे शुभ योग तयार झाला आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, 18 सप्टेंबर रोजी बुध आणि शनी शुभ संयोग निर्माण झाला आहे. 18 सप्टेंबरपासून बुध आणि शनि एकमेकांच्या सातव्या राशीतून भ्रमण करतील. ज्याचा सकारात्मक प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे. बुध-शनीची ही स्थिती काही राशींसाठी फार शुभ असणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा संयोग सकारात्मक असणार आहे. 

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची समोरासमोर भ्रमण करणारी स्थिती खूप शुभ असणार आहे. या राशीच्या व्यक्ती करिअरमध्ये खूप प्रगती करतील. यावेळी केलेली सर्व कामे यशस्वी होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची दृष्टी खूप अनुकूल असणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. या शुभ संयोगाने तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. तसंच बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. अचानक भरपूर पैसे मिळणार आहेत.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी आणि बुधाचे समोरासमोर येणे खूप फलदायी असणार आहे. व्यापार्‍यांसाठीही हा काळ चांगला असणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना परदेशातही नोकरीच्या संधी मिळू शकतात. 

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची ही स्थिती शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुम्हाला इतरांकडून पैसे मिळू शकतात.या शुभ योगाने तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या या काळात दूर होतील. 

मकर रास

मकर राशीच्या लोकांना या शुभ संयोगाने चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते खूप मजबूत असेल. करिअर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. 

कुंभ रास

या राशीच्या लोकांना बुध आणि शनीच्या शुभ संयोगाने चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगली कामगिरी कराल. तुमची आर्थिक बाजू भक्कम असणार आहे. भागीदारीच्या कामात लाभ होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More