Marathi News> भविष्य
Advertisement

'या' ५ राशींच्या लोकांवर धनवर्षाव, बुधचा असा प्रभाव, नोकरी आणि व्यापारात मोठं यश

बुधचा गोचर ५ राशीच्या लोकांकरता अतिशय शुभ असणार आहे.

'या' ५ राशींच्या लोकांवर धनवर्षाव, बुधचा असा प्रभाव, नोकरी आणि व्यापारात मोठं यश

मुंबई : प्रत्येक ग्रह परिवर्तन करत असतो. ग्रहाच्या आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो. २४ मार्च २०२२ ला धन, बुध्दी, चातुर्यचा कारक असलेला बुध ग्रह बदलून मीन राशीत प्रवेश करणार आहे. बुधचा गोचर ५ राशीच्या लोकांकरता अतिशय शुभ असणार आहे. ( राशींच्या लोकांच्या जीवनात खूप छान बदल होणार आहे. धनलाभ होणार आहे. ) 

वृषभ रास 

fallbacks

बुधाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. त्यांचे उत्पन्न वाढू शकते. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. चित्रपट, मीडिया, मार्केटिंग, मॉडेलिंगशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष फलदायी आहे. या काळात त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.

मिथुन रास 

fallbacks

मिथुन राशीच्या लोकांकरता बुध देव नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. नवीन नोकरीची संधी मिळेल. प्रमोशन इंक्रीमेट मिळण्याची संधी मिळेल. कामात मोठं यश मिळेल. धनलाभ होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. ही भविष्यात लाभ देणारी गोष्ट असेल. 

कर्क रास 

fallbacks

कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचा राशी बदल देखील खूप शुभ आहे. त्यांना त्यांच्या कामात यश मिळू लागेल. आतापर्यंत रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील. धनलाभ होईल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास 

fallbacks

बुधाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती-वाढ देईल. व्यापाऱ्यांना मोठा नफा देईल. हा काळ त्यांना असे यश देईल ज्याचा भविष्यातही खूप फायदा होईल. एकूणच सर्व प्रकारे चांगला वेळ.

कुंभ 

fallbacks

कुंभ राशीच्या लोकांना बुधाचे संक्रमण लाभदायक ठरेल. अडकलेले पैसे मिळू शकतात. व्यावसायिकांना मोठे ऑर्डर मिळू शकतात. कामात यश मिळेल. विशेषत: ज्या व्यावसायिकांचे काम परदेशाशी संबंधित आहे, त्यांना खूप फायदा होईल. 

Read More