Marathi News> भविष्य
Advertisement

Budhaditya Yog : शारदीय नवरात्रीमध्ये तयार होणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Budhaditya Yog 2023: सध्या सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कन्या राशीत असून नवरात्रीच्या काळात ते कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. 

Budhaditya Yog : शारदीय नवरात्रीमध्ये तयार होणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या व्यक्तींवर बरसणार पैसा

Budhaditya Yog 2023: दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी करण्यात येते. यावेळी शारदीय नवरात्री 15 ते 23 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी दसरा असून यंदा नवरात्रीच्या काळात सूर्य देव आणि ग्रहांचे राजकुमार बुध त्यांच्या राशी बदलणार आहे.

सध्या सूर्य आणि बुध हे दोन्ही ग्रह कन्या राशीत असून नवरात्रीच्या काळात ते कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. दरम्यान या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगला लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया बुधादित्य राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे. 

सूर्या आणि बुधाचं गोचर

18 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:29 वाजता सूर्य देव कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच वेळी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:16 वाजता बुध कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांच्या धन घरामध्ये बुधादित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे कन्या राशीचे लोक याचा पुरेपूर फायदा मिळेल. यावेळी मान-सन्मानात वाढ होईल. नशीब पूर्ण साथ देईल. शिवाय व्यवसायातही वाढ होईल.

तूळ रास

सूर्य देव आणि बुध देव हे दोन्ही तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुधाच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य योग या राशीच्या लोकांना जीवनात अपेक्षित यश मिळवण्यास मदत करू शकणार आहे. यावेळी व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. 

धनू रास

धनु राशीच्या लोकांच्या उत्पन्नाच्या घरात सूर्य आणि बुध असणार आहे. यावेळी तुम्हाला व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला यावेळी पैसे मिळू शकणार आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होणार आहे. व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते.

मकर रास

सूर्य आणि बुध मकर राशीच्या करिअर घरामध्ये स्थित असल्याने बुधादित्य योग खूप लाभ देणार आहे. नवरात्रीच्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे. या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

कुंभ रास

कुंभ राशीच्या भाग्यस्थानात सूर्य आणि बुध स्थित असतील. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. व्यवसायात मोठी वाढ होईल. व्यवसायात लाभ होईल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More