Raksha Bandhan Niyam in Marathi : धर्मशास्त्रात प्रत्येक सणामागे एक पौराणिक कथा आणि त्यामागे विशेष कारण आहे. प्रत्येक सणाचे आपले असे महत्त्व असते. श्रावण महिना सुरु झाला की, सणाला सुरुवात होते. श्रावणातील एक खास सण असा तो बहीण भावाचा...श्रावण महिन्यातील पौर्णिमेला तिथीला नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. कोळी बांधवांसाठी नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. यादिवशी ते समुद्राला नारळ अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करतात. नारळी पौर्णिमेसोबत अजून सण साजरा होतो तो बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानला गेला आहे. बहीण भावाचे हा सण म्हणजे रक्षाबंधन. यंदा रक्षाबंधनाचा सण 9 ऑगस्ट 2025 ला साजरा होणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याचा प्रगती, आरोग्यासाठी प्रार्थना करते. पण रक्षाबंधनाच्या सण हा फक्त भाऊ बहीण यांच्या प्रेमाचा आहे का? रक्षाबंधनाच्या दिवशी पत्नी पतीच्या मनगटावर राखी बांधू शकते का? याबद्दल धर्मशास्त्र काय सांगते आहे जाणून घ्या. (Can a wife tie a rakhi on her husband wrist Raksha Bandhan Niyam in Marathi)
रक्षाबंधन या सणाबद्दल पुराणात आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक कथा सांगण्यात आल्या आहेत. या ग्रंथांनुसार राखीला रक्षासूत्र असं म्हटलं जातं. रक्षा म्हणजे तुमची सुरक्षिता, संरक्षण...त्यामुळे शास्त्रात असं सांगण्यात आलं की, जे व्यक्ती तुमची रक्षा करतात त्याला तुम्ही रक्षासूत्र बांधलं पाहिजे. तर भविष्य पुराणात अशी कथा सांगण्यात आली आहे की, देवराज इंद्राला वृत्रासुराशी युद्धला जाणार होते तेव्हा पत्नी शची हिने रक्षासूत्र पती इंद्राला रक्षासूत्र बांधल होतं. देवराज इंद्राची पत्नी शची हिने रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरु केली आहे.
वृत्रासुर अजिंक्य होता, त्याने पहिल्या युद्धात देवराज इंद्राचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत जेव्हा देवराज इंद्र दुसऱ्यांदा वृत्रासुराशी युद्धास निघणार होता. तेव्हा श्रावण महिन्याचे आगमन होणार होते. त्यामुळे देवी इंद्राणीने विशेष सूत्र तयार करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी मागितला होता. पती देवराज युद्धाला निघण्यापूर्वी त्यांच्या मनगटावर इंद्राणीने रक्षासूत्र बांधले, हा दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. शची देवीसोबतच इतर देवतांच्या पत्नींनीही आपल्या पतीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्यांना युद्धासाठी पाठवलं. या कथेत असं सांगण्यात आलं की, पत्नीही पतीला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधू शकते.
राखी ही बहीण भावालाच नाही तर पत्नी पतीला, गुरु - शिष्य बांधू शकतात. जे आपले संरक्षण करतात त्याला आपण राखी बांधू शकतो. पुजारी यजमानाला, भक्त त्यांच्या देवाला आणि राजा आपल्या सैनिकांना तसंच स्वार त्यांच्या वाहनाला रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधू शकतात.
एका पौराणिक कथेनुसार जेव्हा आपण रक्षासूत्र किंवा राखी बांधतो तेव्हा या व्यक्तीच्या दीर्घायुष्य आणि रक्षणाची प्रार्थना करतो. तर द्रौपदी आणि श्रीकृष्णाची कथेनुसार जेव्हा श्रीकृष्णाचा बोटाला इजा झाल्यावर द्रौपदीने साडीचा पदर फाडून बांधला होता. तेव्हा द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आश्वासन श्रीकृष्णाने दिले होते. शेवटी रक्षासूत्र हे दोन्ही नात्यासाठी महत्त्वाचे आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)