Marathi News> भविष्य
Advertisement

CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना लावू शकत नाही धक्का, होतील नतमस्तक; मनाशी पक्की गाठ बांधा

CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना जराही धक्का लावू शकत नाही. उलट तेच नतमस्तक होतील, याची मनाशी गाठ बांधा. जाणून घ्या ही चाणक्य निती.

CHANAKYA NITI : शूत्रही तुमच्या केसांना लावू शकत नाही धक्का, होतील नतमस्तक; मनाशी पक्की गाठ बांधा

Chanakya Niti For Enemies: आचार्य चाणक्य (Chanakya) हे एक महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्राचे अभ्यासक होते. आचार्य चाणक्याच्या धोरणाच्या आधारेच चंद्रगुप्त मौर्या यांनी (Chandragupta Maurya) मगधचा सम्राट धनानंद याचा पराभव केला. आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीमध्ये अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या शत्रूचा पराभव करु शकता. चाणक्य नीतीच्या (Chanakya Niti) या टिप्स पाळल्या तर शत्रू तुमचे केस वाकडे करु शकणार नाहीत. बलाढ्य शत्रूसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होईल. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी शत्रूशी सामना करण्याच्या पद्धतींबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊया.

fallbacks

आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti) माणसाने नेहमी सावध आणि सर्तक असले पाहिजे. शत्रूला पराभूत करण्यासाठी सदैव सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. सतर्क राहिल्याने शत्रूच्या चाली तुम्हाला अगोदरच कळतील आणि अडचणीत येणार नाही. म्हणूनच माणसाने नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.

चाणक्य नीतीनुसार, (Chanakya Niti) संयमाचा संग कधीही सोडू नये. प्रतिकूल परिस्थितीतही जर तुम्ही संयमाने वागलात तर शत्रू तुमचे नुकसान करु शकणार नाहीत आणि तुम्ही अडचणीतही येणार नाही. संयम गमावल्याने परिस्थिती बिघडते, म्हणून संयम सोडू नका. संयमी राहिल्यास शत्रूला गोंधळात टाकण्यात यश मिळेल.

fallbacks

आचार्य चाणक्य (Chanakya)म्हणतात की, प्रत्येक लढाई शारीरिक स्नायूंच्या शक्तीने जिंकणे आवश्यक नाही, तुम्ही तुमच्या मनाच्या बळावरही काही लढाया जिंकू शकता. जर शत्रू खूप बलवान असेल तर त्याला घाबरण्याची गरज नाही. यामुळे तुमचा शत्रू कमकुवत होतो. तुमच्यावर भीतीचा प्रभाव पडू देऊ नका.

आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीनुसार (Chanakya Niti)अत्यंत कठीण परिस्थितीत संयमाने काम केले पाहिजे. काळजी केल्याने कोणतीही समस्या सुटत नाही. जर तुम्ही काळजीत असाल तर तुमचे शत्रू हे जाणून आनंदित होतील. म्हणून, संयम ठेवून, एखाद्याने नेहमी समस्या सोडवावी.

fallbacks

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More