Marathi News> भविष्य
Advertisement

Chanakya Niti: पती-पत्नीच्या वयातील अंतर कौटुंबिक कलहास ठरतं कारणीभूत! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान चाणक्य नीति या नावाने प्रसिद्ध आहे. आजही जगभरातील लोकं चाणक्य नीतिकडे कुतूहलाने आणि आदराने पाहतात.

Chanakya Niti: पती-पत्नीच्या वयातील अंतर कौटुंबिक कलहास ठरतं कारणीभूत! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

Age Gap between Husband and Wife: आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे.आचार्य चाणक्य यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान चाणक्य नीति या नावाने प्रसिद्ध आहे. आजही जगभरातील लोकं चाणक्य नीतिकडे कुतूहलाने आणि आदराने पाहतात. मुत्सद्देगिरी, राजकारण, अर्थशास्त्र यासारख्या विषयांवर आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात पती-पत्नीच्या नात्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चांगल्या नात्यासाठी या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 

आचार्य चाणक्य म्हणतात की, पती-पत्नीच्या नात्यात दोघांनीही एकमेकांशी सर्व प्रकारे समाधानी असणे आवश्यक आहे. जर वयात मोठा फरक असेल तर त्यांच्या विचारात पडतो आणि त्यांचे विचारही एकमेकांशी जुळत नाही. त्यामुळे वाद होत असतात. वयातील फरक त्यांच्या शरीरासाठी आणि मनासाठी योग्य नाही. जर एखाद्या वृद्ध व्यक्तीने तरुणीशी लग्न केले, तर असा संसार चालणे कठीण होऊन बसते. अशी परिस्थिती विषासारखी असते आणि वैवाहिक जीवन संपायला वेळ लागत नाही. त्यामुळे पती-पत्नीच्या वयात फारसा फरक नसावा, असं नीतिशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर गरीब व्यक्तीला अपमान टाळायचा असेल तर त्याने कधीही श्रीमंत व्यक्तींच्या कार्यक्रमात जाऊ नये. श्रीमंत नातेवाईकाची राहणीमान भावतं, त्यामुळे आपलं आकर्षण वाढतं. अशा ठिकाणी अपमानित होण्याची दाट शक्यता असते. जर पोट खराब असेल तर समोर कितीही चांगले अन्न ठेवले तरी ते खाऊ नका. अशा परिस्थितीत पोटाला विश्रांती द्या, अन्यथा समस्या कमी होण्याऐवजी वाढेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More