Marathi News> भविष्य
Advertisement

Chanakya Niti: ही तीन कामं न करणाऱ्या व्यक्तींचं जीवन असतं व्यर्थ! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

रोजच्या जीवनातील सवयी काही अंशी त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरतात. चाणक्य नीतित अशाच चुका अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

Chanakya Niti: ही तीन कामं न करणाऱ्या व्यक्तींचं जीवन असतं व्यर्थ! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति

Chanakya Niti For Successful Life: जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही जण या प्रवासात यशस्वी होतात. मात्र काही जणांच्या पदरी फक्त निराशा येते. रोजच्या जीवनातील सवयी काही अंशी त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरतात. चाणक्य नीतित अशाच चुका अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीचं जीवनात अडचणी आणि अपयश येण्यामागे तीन कारणं सांगितली आहेत, जाणून घेऊयात

'येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मं: |
ते मत्र्य लोके भुवि भारभूता मनुष्यरुपेण मृगाश्चरन्ति ||'

ज्ञान : ज्या व्यक्तीकडे ज्ञान नाही किंवा ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाही, त्याचे जीवन व्यर्थ असते. ज्ञानाशिवाय माणसाचे जीवनाना काहीच अर्थ उरत नाही.

धर्म-तप: जे धर्म-कर्म करत नाहीत, आध्यात्मिक साधना-भक्ती करत नाहीत, त्यांचे जीवनही व्यर्थ असते. अशा लोकांना जीवनात शांती मिळत नाही. त्याचबरोबर जीवन सुधारण्यासाठी ते काही करू शकत नाही.

परोपकार: ज्या व्यक्ती आयुष्यात कोणाला मदत केली नाही त्यांचे जीवन देखील पूर्णपणे व्यर्थ आहे. अशा लोकांचा पैसाही लवकर नष्ट होतो. जे आयुष्य फक्त स्वतःसाठी जगतात, त्यांचे आयुष्य एखाद्या पशुसारखे असते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More