Marathi News> भविष्य
Advertisement

Chandal Yog : 21 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळणार; चांडाळ दोष योगापासून मिळेल मुक्ती

Guru Chandal Dosh : गुरु - राहूच्या संयोगामुळे तयार झालेल्या अशुभ चांडाळ योगातून 21 जूनपासून मुक्ती मिळणार आहे. तर काही राशींसाठी आता पुढचे काही दिवस भाग्यशाली ठरणार आहे. 

Chandal Yog : 21 जूनपासून 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळणार; चांडाळ दोष योगापासून मिळेल मुक्ती

Guru Chandal Dosh : वैदिक ज्योतिषानुसार ग्रह आणि नक्षत्र एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. जेव्हा एखादा ग्रह किंवा नक्षत्र दोन पेक्षा जास्त संख्येने कुंडलीतील एकाच घरात भेटतात. तेव्हा या संयोगामुळे काही योग तयार होतात. काही योग हे शुभ तर काही अशुभ असतात. 

सध्या गुरु आण राहूच्या मिलनाने गुरु चांडाळ योग निर्माण झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा योग किंवा दोष अत्यंत अशुभ मानला जातो. गुरु चांडाळ योगामुळे 5 राशींवर अतिशय वाईट परिणाम दिसून आला होता. आता या दोषातून 21 जूनपासून मुक्ती मिळणार आहे. 

आता देवगुरु अश्वनी नक्षत्र सोडून भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे गुरु आमि राहूची युती तुटून गुरु चांडाळ दोष विसर्जित होणार आहे. या दोषमुक्तीमुळे 5 राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे.  (chandal dosh yog bhang guru and rahu dosh dissolved these 5 zodiac signs changes luck)


मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांच्या आयुष्याचे सगळ्यात चांगले दिवस सुरु होणार आहे. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत 2 राजयोग जुळून आले आहेत. बुधादित्य आणि भद्रा राजयोगामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे. 

कर्क (Cancer)

गुरु राहू चांडाळ दोष भंग झाल्यामुळे या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान असणार आहे. धनलाभाचे अनेक योग तुमच्या कुंडलीत तयार झाले आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. 


सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. कामात नशिबाची साथ मिळणार आहे. पदेशात शिक्षणाचं स्वप्न असेल तर ते पूर्ण होणार आहे. नवीन व्यवसायाची योजना तुम्हाला अनेक यश घेऊन येणार आहे. 


धनु (Sagittarius)

गुरु चांडाळ योग भंग होणार असल्याने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच आनंद असणार आहे. घरात उत्साही वातावरण असल्याने तुम्ही प्रसन्न असणार आहात. प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगला काळ असणार आहे. 

मकर (Capricorn)

गुरु राहू चांडाळ दोष मुक्तीमुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. प्रत्येक कामाता यशाचे शिखर गाठणार आहात. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. बँक बँलेन्स चांगल्या स्थिती येणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

 

Read More