Chandra Grahan on Holi 2025 : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते. हिंदू धर्मात होलिका दहन करण्याची जुनी परंपरा आहे. यंदा होळी सणाच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यासोबत यंदा होळीच्या दिवशी या वर्षातील पहिल चंद्रग्रहण आल्यामुळे होळीला रंगांची उधळण करता येणार आहे की नाही, असा प्रश्न पडलाय.
महाशिवरात्रीनंतर येणारा सण असतो तो म्हणून होळीचा. या हिंदू धर्मातील खास सणाच्या तारखेबद्दल लोकांमध्ये गोंधळ पाहिला मिळतो. होळीचा सण नेमका कोणत्या तारखेला आहे, हिंदू पंचांग काय सांगत पाहूयात. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. होळीचा सण पौर्णिमेच्या तिथीनुसार आणि होलिका दहनाच्या शुभ मुहूर्तानुसार निश्चित केला जातो. वैदिक कॅलेंडरनुसार, फाल्गुन पौर्णिमा 13 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता संपेल. उदयतिथीमुळे, रंगांची होळी 14 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे.
या दिवशी होळीच्या पौर्णिमेला स्नान, दान आणि इतर धार्मिक कार्ये केली जातील. तसंच पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथा करतात. फाल्गुन पौर्णिमेच्या स्नानानंतर, दान करायला विसरू नका आणि पितरांसाठी तर्पण देखील करा.
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ वैध राहणार नाही, म्हणून होळीला रंग खेळण्यास कुठलंही बंधन नसणार आहे.
ब्रज प्रदेशात होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, ज्यामध्ये मथुरा, वृंदावन, गोवर्धन, गोकुळ, नांदगाव आणि बरसाना यांचा समावेश आहे. हा उत्सव दोन दिवस चालतो.
जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते तेव्हा चंद्रग्रहण होते. ज्यामुळे सूर्याची किरणे चंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि तो अंशतः किंवा पूर्ण अंधारात बुडातो.
नासाच्या वेबसाइटनुसार, 2025 चे पहिलं चंद्रग्रहण अमेरिका, पश्चिम युरोप आणि पश्चिम आफ्रिकेत दिसेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)