Marathi News> भविष्य
Advertisement

आजचे राशीभविष्य | सोमवार | २० मे २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस 

आजचे राशीभविष्य | सोमवार | २० मे २०१९

मेष- कामाच्या व्यापासोबतच जबाबदारीही वाढेल. दिवस बऱ्याच अंशा व्य़ग्र असेल. व्यापाराच्या बाबतीत काही गोष्टी सुधारू शकतील. बऱ्याच अंशी यशस्वी राहाल. नोकरीच्या ठिकाणी काही अंशी शांतता मिळेल. नव्या प्रवासयोगांची शक्यता आहे. अडचणींवर मात करण्याचाही बेत आखाल. 

वृषभ- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. डोक्याच अनेक कल्पना असतील. मिळकत आणि खर्चाकडे लक्ष द्या. यश संपादन करण्यासाठी संयम बाळगा. मित्रांची मदत मिळेल. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळासाठी चालणाऱ्या कामांचा फायदा होईल. अनेक प्रकारचे विचार कराल. अविवाहितांसाछी लग्नाची बोलणी होऊन लग्न ठरण्याचीही चिन्हं आहेत. मित्रपरिवार आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. शुभवार्ता कळेल. 

कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्याचाही योग आहे. पैशांच्या बाबतीत अडथळे येण्याची शक्यता आहे. काही वाद असतील तर ते लगेचच सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवहारकौशल्य आणि सहनशीलतेने काम करा, अनेक गोष्टी सुकर होतील. 

सिंह- आर्थिक परिस्थितीमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हीही आनंदी असाल. महत्त्वाकांक्षा बळावेल. व्यापार किंवा नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या तणावापासून दूर राहाल. 

कन्या- नोकरी आणि व्यापारामध्ये काही नव्या गोष्टींसाठी पुढाकार घ्याल. कामाच्या पद्धतीत काही नवे प्रयोग कराल. आजचा दिवस बेताचा आहे. ज्याविषयी विचार कराल त्या गोष्टी पूर्ण होतील. साथीदारासोबत वेळ व्यतीत कराल. दैनंदिन कामांमध्ये फायदा होईल. प्रॉपर्टीची कामंही पूर्ण होतील. कौटुंबीक वादांपासून दूर राहाल. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. त्यापासून फायदाही मिळेल. कुटुंबाची बरीच कामं तुम्हाला पूर्णत्वास न्यावी लागतील. मित्रपरिवारासोबत वेळ व्यतीत करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. 

वृश्चिक- तुमच्यासाठी आजचा दिवस खास आहे. आज अनेक अशा गोष्टी समोर येतील ज्यांचा तुम्हाला फायदा होईल. समजुतदारपणाचा वापर करा. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींपासून फायदा मिळेल. 

धनू- नोकरी, करिअर आणि आर्थिक परिस्थितीच्या अनुशंगाने दिवस चांगला असेल. नव्या नोकरी किंवा प्रमोशनच्या शोधात असाल, तर हे प्रयत्न यशस्वी ठरतील. उत्साह शिगेला असेल. कामाच्या ठिकाणी अनेकजण तुमच्या मताशी सहमत असतील. इतरांची मदत मिळेल. 

मकर- असं एखादं काम कराल, ज्याचा तुम्हाला बराच फायदा होईल. नवं काम सुरु करण्यापूर्वी जुनी कामं पूर्णत्वास न्या. आज इतरांवर मात करण्याची तीव्र इच्छा होईल. 

कुंभ- आज तुम्ही धीराने काम करा. दिवसभर पैशांच्या बाबतील विचार करत राहाल. जमिनीचे व्यवहार धनलाभ देऊ शकतात. काही नवं करु इच्छिता तर, तुमच्या समोर बरीच कामं येतील. दैनंदिन कामं वाढतील. कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याचा विचार कराल. पुढे जाण्यासाठी काहीतरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा. 

मीन- आज जे काही काम कराल त्याचा फायदाच होईल. मनात पैशांविषयी अनेक विचार येतील. ज्यावर तुम्ही लगेचच काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. कागदोपत्री कामं पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. फिरण्यासाठी ही वेळ चांगली आहे. 

Read More