Marathi News> भविष्य
Advertisement

Daily Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींनी वादापासून राहा दूर

'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचं भविष्य अत्यंत महत्त्वाचं... जाणून घ्या आजंच भविष्य  

Daily Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींनी वादापासून राहा दूर

मेष : घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. कोर्टातल्या गोष्टींपासून दूर राहा. 

वृषभ : तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कोणत्याही सन्मानीत व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. धनलाभाचे नवीन मार्ग दिसतील. कामात यश प्राप्त होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. 

मिथुन : स्वतःसाठी वेळ काढा. तुमच्या स्वभावामुळे नात्यात विश्वास निर्माण होईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधीत लोकांकरता शुभ दिवस. कोणत्याही वादापासून आज दूर राहा. आज दिवस चांगला आहे. 

कर्क : तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.  सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल. 

सिंह : दुसऱ्यांच्या अनुभवातून शिका. धनप्राप्त होणार आहे. अनावश्यक खर्च टाळा. कामात यश प्राप्त होईल.  जुन्या मित्रांसोबत भेटी होतील. बाहेरचं खाऊ नका. घरातील पौष्ठिक आहारचं घ्या आरोग्याकडे लक्ष द्या. दिव स चांगला आहे. 

कन्या : नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. रविवार आज भरलेला असेल. मन प्रसन्न राहिल. वरिष्ठांकडून मदतीची साथ मिळेल. आजचा दिवस खूप खास आहे. रखडलेली कामे पूर्ण करा. सोशल मीडियावर सक्रिय राहील्याने फायदा होईल.

तूळ : दुसऱ्या लोकांसोबत राजकारणात जाण्याचा प्रयत्न कराल. मनात काही तरी नवं आणि खास करण्याचा प्रयत्न असेल. आजचा दिवस मेजवाणीचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादापासून दूर राहा. धार्मिक स्थळाला भेट दिल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. 

वृ्श्चिक : आज तुम्हाला कुटुंबात खूप महत्व आहे. धनलाभ होणार आहे. शिक्षणात उत्तम नशिबाची साथ मिळणार आहे. विवाहितांना संतती सुख लवकरच मिळेल. पण ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधान रहा. 

धनू : दिनचर्येत मोठा बदल करा. तुमची आवड आज तुम्हाला पुढे नेण्यास मदत करणार आहे. नवी सुरूवात करण्याची ही संधी आहे. आर्थिक कार्यात मन शांत राहा. तरुणांनी न्यायालयीन गोष्टींपासून दूर राहा.  

मकर :  या राशीच्या व्यक्तीमंनी ध्येयावर लक्ष केंद्रित करा. नवीन गोष्टी सुरू करण्याची आशा असेल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खास ठरेल. रिअल इस्टेट लोकांकरता आजचा दिवस महत्वाचा आहे. मुलींच्या विवाहाचे योग आहेत. 

कुंभ : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. जे काही करायचं आहे, ते विचार करुन करा. सर्व ठिकाणी सतर्क राहण्याची नितांत गरज आहे. 

मीन : आजचा दिवस उत्तम असेल. कार्यक्षेत्रात प्रगती करण्याची सुवर्णसंधी. पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक बांधिलकी जपाल. कुटुंबाकडून सकारात्मक विचार तुमच्यासोबत असतील याचा अनुभव येईल. 

Read More