Gudi Padwa 2025 : हिंदू संस्कृतीतीत पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत वापरतो म्हणून वर्षारंभाला गुढीपाडवा हा चार मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे. गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजयध्वज. याच दिवशी ब्रम्हदेवाने जग उत्पन्न केलं. सृष्टी निर्माण केली, प्रभु रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून, रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या - तोरणे उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस.
पुराणांमध्ये दिलेली 60 संवत्सरे आहेत. त्यापैकी प्रत्येकाला वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला त्यामुळे हा दिन विजयदिन म्हणून ओळखला जातो. शालीवाहन राजाच्या विजयदिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालीवाहन शक म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. अशा गुढीपाडव्याचा सणाबद्दल संपूर्ण माहिती, पूजा विधी आणि साहित्याबद्दल जाणून घ्या.
हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 04.27 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी दुपारी 12.49 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण 30 मार्च रोजी साजरा केला जाईल.
गुढी पाडवा पूजेसाठी शुभ मुहूर्त 30 मार्च 2025 ला सकाळी 6.13 ते सकाळी 10.22 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यासोबत दुपारी 12.00 वाजेपासून 12.49 वाजेपर्यंत असणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्व दिशेला गुढी उभारणे शुभ मानले जाते. कारण सूर्योदय फक्त याच दिशेने होतो. म्हणून, पूर्व दिशा ही शुभता, ऊर्जा आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. मात्र, तुम्ही गुढी ईशान्य दिशेला देखील उभारू शकता, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते.
वेळूची काठी
कडुलिंबाचा पानं
आंब्याची पानं
दोन तांब्याचे कलश
काठापदराची साडी
ब्लाऊज पीस
साखरेचा हार
खोबऱ्याचा हार
लाल कलरचा धागा
चौरंग किंवा पाठ
फुलांचा हार
कलश
हळदी
कुंकू
तांदूळ
पाणी
पंचामृत
साखर
पिवळे चंदन
अक्षदा
थोडीशी फुलं
आरती
कापूर
अगरबत्ती किंवा धूप
लक्ष्मी मातेची नाणी
सुपारी
पानं
सुपारी
शुभ मुहूर्तावर गुढी उभारण्यासाठी उंच बांबूच्या काठीला प्रथम तिळाचं तेल लावून त्यानंतर पाण्याने शुद्ध करावं. त्यानंतर काठीच्या वरच्या टोकाला स्वच्छ वस्त्र किंवा साडी चोळी, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधावी. त्यावर चांदी किंवा तांब्याचं कलश उपडा ठेवावं. ज्या ठिकाणी तुम्ही गुढी उभारणार आहेत तिथे चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर नारळ ठेवून कलशाची स्थापना करावी. त्यानंतर यावर तुमची मानाची गुढी उभारावी. आता गुढीला अष्टगंध, हळद कुंकू लावा. आता श्रीखंड पुरी, आंबाचा रस किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)