Marathi News> भविष्य
Advertisement

Guru Purnima 2022 | गुरू पोर्णिमेला त्रिग्रह योग; या 3 राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ

हिंदू धर्मात महर्षी वेद व्यास जयंती ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यावेळी 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी त्रिग्रही योग तयार होत आहे. जो काही राशीच्या लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे.

Guru Purnima 2022 | गुरू पोर्णिमेला त्रिग्रह योग; या 3 राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ

Trigrahi Yog On Guru Purnima 2022: हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. गुरू हे पृथ्वीवर देवासारखे असतात असे म्हणतात. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. यंदा गुरूपौर्णिमा 13 जुलैला आहे. या वर्षी गुरुपौर्णिमेला सूर्य, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह मिथुन राशीत बसणार आहेत. मिथुन राशीमध्ये तयार झालेला हा त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. या 3 राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया या गुरुपौर्णिमेला कोणत्या राशींना या योगाचा फायदा होणार आहे.

मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. या राशीच्या लोकांना या योगातून नशिबाची साथ मिळेल. या काळात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर करिअरमध्येही प्रगती होऊ शकते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा योग या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात अनावश्यक खर्च कमी होतील.

वृषभ - या शुभ संयोगाने या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. आदर वाढेल. त्याचबरोबर या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

धनु - या वर्षीची गुरुपौर्णिमा धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांच्याही शक्यता निर्माण होत आहेत. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल.

Read More