Marathi News> भविष्य
Advertisement

Guru Shukra Yuti 2025 : 5 जूनला गुरू आणि शुक्रची अनोखी युती, लाभ दृष्टि योगमुळे ‘हे’ भाग्यशाली लोकं खेळणार पैशात

Guru Shukra Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येत्या 5 जूनला खास योग घडून येतो आहे. यादिवशी गुरु आणि शुक्र एकत्रिपणे लाभ दृष्टी योगाची निर्मिती करत आहेत. या योगामुळे काही राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे.     

 Guru Shukra Yuti 2025 : 5 जूनला गुरू आणि शुक्रची अनोखी युती,  लाभ दृष्टि योगमुळे ‘हे’ भाग्यशाली लोकं खेळणार पैशात

Shukra Guru Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांना खूप महत्त्व आहे. या शास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह आपली स्थिती एक ठराविक वेळी बदलत असतात. शास्त्रातील अतिशय महत्त्वाचा ग्रह आणि देवांचा गुरू बृहस्पति आणि राक्षसांचा गुरू शुक्र यांची युती होणार आहे. गुरु आणि शुक्र यांचा संयोग येत्या 5 तारखेला होणार असून या दिवशी ते दोघेही 60 अंशांच्या कोनीय राशीवर राहणार आहे. दोन्ही शक्तिशाली ग्रहांच्या या कोनीय युतीला लाभ दृष्टी असं म्हणतात. या संयोगामुळे 5 जूनपासून अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. या लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ आणि वाढ-प्रमोशन मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊयात. 

तूळ रास 

गुरु आणि शुक्र यांची ही युती तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. या काळात, तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही कोणतेही काम हाती घ्या, त्यात यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना नोकरीचा योग चालून येणार आहे. तुमचे मन आध्यात्मिक कार्याकडे वळणार आहे.  ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. 

कुंभ रास

गुरु आणि शुक्र ग्रहाचा फायदेशीर दृष्टी योग तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. या संयोजनामुळे, तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या बोलण्याने इतरांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह पगारवाढ देखील होण्याचे शुभ संकेत मिळतात. तुम्हाला नवीन ठिकाणाहून नोकरीची ऑफर देखील मिळणार आहे. 

धनु रास 

5 जून नंतर फायदेशीर दृष्टी योगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी सुवर्णकाळचा योग सुरु होणार आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ राहणार आहे. तुम्ही कोणतेही काम सुरू कराल, त्यात तुम्हाला यश मिळण्याची पूर्णपणे मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न प्राप्त होणार आहे. तुमची परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला अनेक वर्षांनी अनेक जुने मित्र भेटणार आहेत. 

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More