Marathi News> भविष्य
Advertisement

आर्थिक प्रगतीसाठी घराच्या 'या' दिशेला लावा गोकर्णाचं रोप, घरात सुख-समृद्धी नांदेल

Aparajita Plant Benefit: घरात गोकर्णाचे रोप या दिशेला लावा संपत्ती तर वाढेलच पण सुख समाधानही मिळेल. 

आर्थिक प्रगतीसाठी घराच्या 'या' दिशेला लावा गोकर्णाचं रोप, घरात सुख-समृद्धी नांदेल

Aparajita Plant Benefit: वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक ठिकाणाचा कोपरा आणि वस्तु सजवल्या जातात. घरातील कोणत्या दिशेला काय ठेवायचे हे देखील वास्तुशास्त्रानुसार ठरवले जाते. या प्रमाणेच घरातील झाडं आणि रोपंदेखील आपल्या आयु्ष्यावर नकळत प्रभाव टाकत असतात. या रोपांमधील एक रोप म्हणजे निळ्या रंगाचे गोकर्ण. या फुलाला कृष्णकांता किंवा विष्णुकांता असंही म्हणतात. याची फुलं पांढऱ्या रंगाचीदेखील असतात. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णु यांना निळं गोकर्णाचे फुल खूप प्रिय आहे. याला धन बेलदेखील म्हटलं जातं. गोकर्णाचे झाड कोणत्या दिशेने लावणे योग्य असतात, हे जाणून घेऊयात. 

आचार्य मदन मोहन यांच्यानुसार, निळ्या रंगाचे गोकर्णाचे फुल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात.यामुळं घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहते. त्याचबरोबर, धार्मिक मान्यत्येनुसार, निळ्या रंगाचे गोकर्ण भगवान विष्णुंना प्रिय असल्याने देवी लक्ष्मी यांनादेखील प्रिय आहे. ज्या घरात हे झाड आहे तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि आर्थिक प्रगतीसाठी केलेली मेहनत यशस्वी होते. 

निळ्या रंगाचे गोकर्णाचे झाड कुटुंबातील सदस्यांची बुद्धी तल्लख करते, असं मानले जाते. हे फुल भगवान विष्णुंना वाहिल्यामुळं कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही. असं म्हणतात की, शनिदेवांना निळया रंगाचे गोकर्ण फुल वाहिल्याने शनिची साडेसातीची दशा कमी होते.

वास्तुशास्त्रानुसार, निळ्या रंगाचे गोकर्णाचे झाड उत्तर दिशेला लावलं पाहिजे. यामुळं शुभं फळ मिळतात आणि घरात आनंद आणि सुख शांती नांदते. लक्षात ठेवा की, हे झाड कधीच पश्चिम किंवा दक्षिण दिशेला कधीच लावू नये. कारण या दिशेला गोकर्णाचे झाड लावणे अशुभ मानले जाते. हे रोप आपण मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूलादेखील ठेवू शकता, असे केल्याने शुभ मानले जाते. 

गोकर्णाचे फुल घरात गुरुवारी आणि शुक्रवारी लावणे शुभ मानले जाते. गुरुवारी भगवान विष्णु यांचा दिवस मानला जातो आणि या दिवशी रोप लावणे घरात सुथ आणि आर्थिक प्रगती घेऊन येते. शुक्रवारी रोप लावल्याने घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More