Marathi News> भविष्य
Advertisement

तुमच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असतील तर तुमचं नशीब खूप बलवान, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

Hair On Body Astrology : ज्योतिषशास्त्रात तुमच्या शरीराच्या ठेवण आणि त्यावर असलेल्या खुणा, तीळ, केस यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं असं सांगण्यात आलंय.     

तुमच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असतील तर तुमचं नशीब खूप बलवान, काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

Hair On Body Astrology : हिंदू धर्मात अनेक प्रकारचे शास्त्र असून या शास्त्राच्या माध्यमातून मानवी जीवन आणि त्यांच्या आयुष्यात होणारे परिणाम याबद्दल माहिती दिली जाते. ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीनुसार मानवी जीवनावर त्याचा सकारत्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो. त्यासोबत तुमच्या शरीराची ठेवण, सर्व अवयवांची रचना आणि त्यावरील खुणा या मानवी जीवनावर परिणाम करत असतात. तुमच्या शरीरावरील तीळ असो किंवा एखाद्या विशिष्ट जागा केस असणे, यावरूनही तुमच्या नशीब कसं असतं हे सांगितलं जातं. आज शरीराच्या काही भागांवरील केसांच्या तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेणार आहोत. 

'या' प्रकारच्या केसांचा रंग शुभ!

आमच्या तज्ज्ञांच्या मते, हस्तरेषाशास्त्र असं दर्शवतं की काळे, लांब आणि जाड केस असलेली कोणतीही महिला ही शुभतेचे भांडार असते. अशा केस असलेल्या महिलेशी लग्न केल्याने पतीचे भाग्य उजळतं आणि त्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होतं. 

महिलांंच्या हातावर केस 

ज्या महिलांच्या हातावर खूप केस असतात त्यांच्या नशिबाची दारं उघडतात असं मानलं जातं. अशा महिला त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्यातही तज्ज्ञ असतात. अशा महिलांचे मनही तीक्ष्ण असतं. पण, या महिलांमध्ये जिद्दीची कमतरता दिसते. 

पुरुषांच्या हातांवर केस

ज्या पुरुषांच्या हातावर केस असतात ते नेहमीच भाग्यवान असतात. असे पुरुष हुशार असतात आणि प्रत्येक निर्णय अतिशय हुशारीने घेण्यावर विश्वास ठेवतात. असे पुरुष भविष्यातील नियोजनात तज्ज्ञ असतात. जरी असे पुरुष खूप कंजूष असतात मात्र त्यांच्या या स्वभावाचा त्यांना भविष्यात खूप फायदा मिळतो. 

छातीवर केस

हस्तरेषाशास्त्रात कोणत्याही महिला किंवा पुरुषाच्या छातीवर केस असणे खूप शुभ मानले गेले आहे. एकीकडे, अशा पुरुषांचा स्वभाव समाधानाने भरलेला असतो. दुसरीकडे, अशा महिला पैसे वाचवण्यावर विश्वास ठेवतात आणि ते हुशारीने खर्च करतात.

कानांवर केस

ज्या लोकांच्या कानावर केस असतात, मग ते पुरुष असोत किंवा महिला, त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवता येतो. असे लोक खूप विश्वासार्ह असतात आणि इतरांच्या भावनांचा आदर कसा करायचा हे देखील त्यांना माहिती असतं.

पाठीवर केस

ज्या पुरुषांच्या पाठीवर केस असतात ते धैर्य आणि शौर्याने परिपूर्ण असतात. असे पुरुष कोणत्याही समस्येला धैर्याने तोंड देतात. हे लोक खूप श्रीमंत आणि धीरवान देखील आहेत. अशा पुरुषांना इतरांचा आदर कसा करायचा हे देखील माहित असते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More