Baba Vanga Predictions : बल्गेरियामध्ये जन्माला आलेल्या बाबा वांगा यांचं 1996 मध्ये निधन झालं. पण निधनापूर्वी बाबा वांगाने अनेक वर्षांसाठी भविष्यवाणी केली आहे. आतापर्यंत आर्थिक संकटे, गंभीर हवामान घटना आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये बाबा वांगाचे भाकीत खरं ठरलं आहे. भारत - पाकिस्तान युद्धाचे भाकीतही बाबा वांगे यांनी केलं होतं. नेमकं काय म्हणाले होती बाबा वांगा पाहूयात.
22 एप्रिला 2025 ला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्यात 27 जणांचा जीव गेला होता. यानंतर भारताने 6-7 मे 2025 रोजी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर अर्तंगत त्यांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त भागातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. पाकिस्तानला भारताची ही कारवाई जिव्हारी लागली. त्यांनी 7-8 मे 2025 ला पाकिस्तानी भारतातील 4 राज्यातील 15 शहरांवर लक्ष्य करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा हा हल्ला उधळून लावला. त्यानंतर 8-9 मे रोजी भारत - पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढला आणि पाकिस्तानी भारतावर ड्रोन हल्ला केला. भारतीय सैनिकांनी हा हल्लाही जोरदार उत्तर देत त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आणली. त्यानंतर भारतही गप्प बसला नाही, पाकिस्तानची राजधानी लाहोरसह इस्लामाबाद, कराचीमध्ये भारताने हल्ला केला. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचे सायरन वाजले.
बाबा वांगा म्हणाले की, 2025 मध्ये युरोपातील अनेक देशांमध्ये भयंकर युद्ध होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम युद्धामुळे अनेक देशांवरही होईल आणि मानवताही धोक्यात येईल. रशिया-युक्रेन युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बाबा वांगाची ही भविष्यवाणी खरी होताना पाहिला मिळाली.
बाबा वांग ही एक महिला होती. बाबा वांगाचा जन्म 1911 मध्ये बल्गेरियात झाला. तिचं नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा होतं. वयाच्या 12 व्या वर्षी एका हिंसक वादळात तिने आपली दृष्टी गमावली, या घटनेने तिला भविष्य पाहण्याची शक्ती दिली असा दावा तिने नंतर केला. अनेक प्रमुख जागतिक घटनांचे अचूक भाकित करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. तिचं निधन 1996 मध्ये झाले, मात्र त्यांच्या भविष्यवाण्या आजही त्यांच्या अनुयायांमधून आणि इतरांकडून प्रसारित केल्या जातात. काही लोकांना त्याच्या भाकित्यांवर शंका आहे, तर काहींना त्यांच्या अचूकतेबद्दल आश्चर्य वाटते. वांगा यांनी 2025 मध्ये विनाशकारी भूकंपांचा अंदाजही वर्तवला होता. 28 मार्च रोजी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला आणि 1,700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. या भूकंपाचा फटका थायलंडलाही बसला. जिथे किमान 10 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. याआधीही, 9/11 दहशतवादी हल्ले, 1997 मध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि कोविड-19 साथीच्या आजारासारख्या त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.