Itchy Palm Sign : धार्मिक शास्त्रात ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि समुद्रशास्त्र असे अनेक शास्त्र आहे. या शास्त्रात तुमच्या शरीरातील खुणा, केस, डोळे आणि हाता-पायावरील रेषा यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. त्यांचा भविष्याचे संकेत सांगितले जातात. लहान मोठ्या घटनांबद्दल संकेत देण्यात येतात. हे संकेत शुभ किंवा अशुभ असतात. अनेकांच्या हातांना अचानक खाज सुटते. कधी डाव्या आणि तर कधी उजव्या...पण तुम्हाला माहितीये कुठला हाताला खाज सुटल्यावर आर्थिक फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊयात.
या शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचा उजवा हात किंवा शरीराचा उजवा भाग खाजत असेल तर ते अशुभ मानलं गेलं आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमचे पैसे कमी होऊ शकतात किंवा तुम्हाला अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावे लागण्याची शक्यता आहे.
जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात वारंवार खाजत असेल तर ते शुभ मानले गेले आहे. हे संकेत असत तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ मिळणार आहे. या शास्त्रात असं मानले गेले की जेव्हा तुमचा डावा हात खाजवतो तेव्हा त्याचा अर्थ चांगला दिवस येणार आहे.
डोळ्यांना किंवा डोळ्यांभोवतीच्या भागात खाज सुटणे म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला कुठूनतरी आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात.
छातीवर खाज सुटणे म्हणजे तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळणार आहे. त्याच वेळी, जर एखाद्या महिलेला तिच्या छातीवर खाज येत असेल तर ते मुलाशी संबंधित आहे. कोणीतरी किंवा दुसरी व्यक्ती तुमच्या मुलासाठी काही समस्या दर्शवते.
ओठांना खाज सुटणे म्हणजे लवकरच तुम्हाला स्वादिष्ट अन्न खाण्याची संधी मिळेल. तुम्हाला कुठूनतरी आमंत्रण मिळू शकते किंवा घरी चांगले जेवण मिळू शकते. ओठांना खाज येणे हे देखील गोड बोलण्याचे लक्षण आहे.
पाठीवर खाज सुटणे म्हणजे आजार किंवा त्रास. पायांना खाज सुटणे हे प्रवास योग दर्शवते. उजव्या खांद्यावर खाज येणे हे मुलांच्या आनंदाचे लक्षण आहे.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)