Marathi News> भविष्य
Advertisement

Graha Gochar June: सूर्य आणि शनीसोबत 'या' ग्रहांची चाल बदलणार; काही राशींना लागणार लॉटरी!

June Grah Gochar 2023: जून महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे.  ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल चार राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. 24 जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 

Graha Gochar June: सूर्य आणि शनीसोबत 'या' ग्रहांची चाल बदलणार; काही राशींना लागणार लॉटरी!

June Grah Gochar 2023: जून महिना हा ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीकोनातून खास असणार आहे. या महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मतानुसार, ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे हे बदल चार राशींसाठी फलदायी ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे.  

जून महिन्याच्या सुरुवातीला बुध 7 तारखेळा मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे 15 तारखेला सूर्य वृषभ राशीतून बाहेर पडणार आहे. तर 17 तारखेला शनी स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. याशिवाय 24 जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. तसंच महिना अखेरीस मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहे. दरम्यान याचा सकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे,

मेष रास

जूनमध्ये ग्रहांचा बदल या राशींच्या व्यक्तींसाठी नव्या संधी उपलब्ध करणारा असणार आहे. खास करून आरोग्याच्या दृष्टीने या राशीचा व्यक्तींसाठी हा काळ उत्तम असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची भरपूर प्रगती होणार आहे. जमीन किंवा मालमत्ता खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला बराच फायदा मिळू शकणार आहे. प्रेमसंबंधांसाठी हा काळ चांगला असण्याची चिन्ह आहेत.

मिथुन रास

या राशींच्या व्यक्तींसाठी जून महिना लाभदायक राहणार आहे. ग्रहांच्या या मोठ्या बदलामुळे विद्यार्थ्यांना या काळाच चांगला परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही या काळामध्ये जे काम हाती घेणार आहात, त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुम्ही जे ध्येय ठेवलं असेल ते साध्य करण्यात यशस्वी होणार आहात. कामाच्या ठिकाणी तुमचं उच्चस्तरावरून कौतुक होणार आहे. वैवाहिन जीवनात असणाऱ्या समस्या दूर होऊ शकतील.

कन्या रास

हा काळ या राशींच्या व्यक्तींसाठी चांगला असू शकतो. जर तुमच्या डोक्यात नवीन बिझनेसविषयी काही कल्पना असतील तर त्यावर काम करण्यास सुरुवात करावी. तुम्ही करत असलेल्या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. तुमचे इच्छित परिणाम प्राप्त करण्यास सक्षम असणार आहात. काही प्रमाणात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते, पण त्याचं तसं फळंही मिळणार आहे. कोणत्याही कामामध्ये वेळ वाया घालवू नका.

तूळ रास

जून महिना तुमच्यासाठी आनंददायी असू शकणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्णपणे मिळणार आहे. तुमचं आरोग्य या काळात सुधरणार आहे. तुम्हाला हवे असतील तसे शुभ परिणाम मिळू शकतील. तुम्ही घेतलेले महत्वाचे निर्णय यशस्वी ठरणार आहेत. कामाच्या ठिकाणी विश्वास टाकून तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More