Marathi News> भविष्य
Advertisement

श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ...

Shravan Monday Vrat Niyam : यंदा श्रावण  महिना 4 जुलैपासून सुरु होत आहे. श्रावण हा 31 ऑगस्टला संपणार आहे. मात्र, श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ तुमच्यावर रागावतील.   

श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ...

Shravan 2023 : श्रावण 4 जुलैपासून सुरु होत आहे. हिंदू धर्मात  श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी  श्रावण पूर्ण दोन महिने असणार आहे. यावेळी शिव भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी शिवभक्तांना पूर्ण आठ सोमवार मिळणार आहेत. यादरम्यान सोमवारी उपवास आणि व्रत करणाऱ्यांनी काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हीही श्रावण सोमवारी व्रत करणार असाल तर काही गोष्टी नक्की जाणून घ्या. 

हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. शिवभक्तांसाठी यंदाचा श्रावण हा विशेष आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवभक्त जलाभिषेक करुन शिवलिंगाची पूजा करतात. श्रावण सोमवारचे व्रत केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. हे व्रत पूर्ण नियमाने पाळल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते.  जर कोणाच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यांनीही श्रावण सोमवारचे व्रत करावे. यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. दुसरीकडे, ज्यांना मुल होत नसेल त्यांनी श्रावण सोमवारी उपवास केल्याने त्यांना विशेषतः फलदायी होते. श्रावण सोमवारचा उपवास करणाऱ्यांनी काही नियमांची काळजी घेतली पाहिजे. याबाबतचे काही नियम जाणून घ्या.

श्रावण सोमवार व्रतचे नियम

- श्रावण सोमवारी उपवास करणाऱ्या व्यक्तीने काही नियम पाळले पाहिजेत. श्रावण सोमवारचा उपवास संध्याकाळपर्यंत ठेवला जातो, तोपर्यंत उपवास करावा. संध्याकाळच्या पूजेनंतर उपवास सोडला जातो. त्याआधी उपवास सोडू नये.

- श्रावण सोमवार व्रताच्या दिवशी व्यक्तीने स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. सकाळी लवकर उठावे आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करुन पूजा करावी.

- श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या दिवसात मांसाहार, मद्यपान आंदींचे सेवन टाळावे.

- श्रावण सोमवार व्रताच्या दिवशी कोणीही कोणाबद्दल वाईट बोलू नये. तसेच नकारात्मक विचार मनात आणू नयेत. ते तुमच्यासाठी चांगले असते. 

- श्रावण महिन्यात हिरव्या पालेभाज्या खाण्यास मनाई आहे. खरं तर, श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो, त्यामुळे हिरव्या भाज्यांना कीड लागते. त्यामुळे भाज्या खाऊ नयेत.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

Read More