Marathi News> भविष्य
Advertisement

Magh Purnima 2023 : माघ पौर्णिमेच्या दिवशी अशी कराल पूजा, धन-संपत्तीने भरेल घर

Magh Purnima Shubh Muhurta 2023 : या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. माघ पौर्णिमेचे शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि माघ पौर्णिमा कशी करावी.

Magh Purnima 2023 : माघ पौर्णिमेच्या दिवशी अशी कराल पूजा, धन-संपत्तीने भरेल घर

Magh Purnima 2023: यंदाची माघ पौर्णिमा येत्या शनिवारी म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी रविवारी समाप्ती होणार आहे. ही पौर्णिमा ज्योतिषीय दृष्टीकोनातूनही अत्यंत महत्वाची मानली गेली आहे. या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करतो. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गातील सर्व देवी-देवता पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात.  

हे विषेश योग

माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, आश्लेषा नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 07:06 पासून सुरू होत आहे, जो दुपारी 12:13 पर्यंत राहणार आहे.  

शुभ मुहूर्त

माघ पौर्णिमा सुरू : 4 फेब्रुवारी 2023, शनिवारी रात्री 9.28 वाजता

माघ पौर्णिमा समाप्ती: 5 फेब्रुवारी 2023, रविवार रात्री 11.59 वाजता

वाचा: यावर्षी एकूण 7 वेळा मंगळ गोचर, 'या' राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, खिशात पैसा खुळखुळणार

या दिवशी काय करावं?

  • माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. कारण भगवान विष्णू पिंपळाच्या झाडावर वास करतात असे मानले जाते. म्हणूनच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. असे केल्याने पितरही प्रसन्न होतील.
  • माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व असते. म्हणूनच या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना घोंगडी,फळे इत्यादी वस्तूंचे दान करतात. जर तुम्ही पण असे केलात तर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल.
  • या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला दूध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. तसेच श्री सुक्तमचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल. 
  • तसेच माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी जो व्यक्ती पवित्र नदीत स्नान करतो. त्याला मोक्ष मिळतो. तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर शास्त्रानुसार या दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगण्याचा नियम आहे.
Read More