Mahabharat Katha: छळ-कपट, धर्म-अधर्माची कथा म्हणजे महाभारत. महाभारतात कथेतील घटना या आजच्या काळातही प्रासांगिक आहेत. द्वापारयुगात घडलेल्या महाभारतातील घटनांचे दाखल आजही कलियुगात दिले जातात. महाभारतातील शिकवण आजच्या काळातील आयुष्याला चपखल बसते. अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की जर पांडवांसोबत स्वतः भगवान कृष्ण होते तरीदेखील त्यांना इतक्या दुःखाचा सामना का करावा लागला. हाच प्रश्न पांडवांच्या मनातदेखील होता. याचे उत्तरच भीष्म पितामहांनी शेवटच्या क्षणी पांडवांना दिले.
जेव्हा महाभारत युद्ध संपले तेव्हा भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर होते. ते देहत्याग करण्यासाठी सूर्याचे उत्तरायण होण्याची वाट पाहत होते. तेव्हा एक दिवस भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन भीष्म पितामह यांच्याकडे पोहोचले होते. तेव्हा पितामाहंच्या डोळ्यात अश्रू होते. हे पाहून पांडवांना आश्चर्य वाटले. युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्ण यांना विचारले की, माधव, हे तेच भीष्म आहेत जे ब्रह्मचारी आहेत, ज्यांचे जीवन तपश्चर्येने भरलेले आहे, ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी स्वतःला समर्पित केले आहे. मग ते शेवटच्या क्षणी का रडत आहेत? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की स्वतः भीष्म पितामह यांचे उत्तर देतील.
यावर भीष्म पितामह म्हणाले की, पांडवांच्या सोबत देव स्वतः होते आणि त्यांचे रक्षण करत होते, तरीही त्यांना आयुष्यात खूप दुःख आणि वेदना सहन कराव्या लागल्या. हे विचारून मला काळजी वाटते. शेवटी, हा दैवाचा कसला खेळ आहे? पण या लीलेने मला समजावून सांगितले की देवासोबत असण्याचा अर्थ असा नाही की जीवनात दुःख राहणार नाही. उलट, आयुष्यात दुःखे येतीलच पण देवाचा आधार तुम्हाला त्या दुःखांशी लढण्याची शक्ती देईल आणि धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देईल.
आयुष्यात सुख येऊदेत किंवा दुखः नेहमीच देवाचा आधार घ्या आणि प्रत्येक परिस्थितीत पूर्ण धैर्य आणि सकारात्मकतेसह सामना करा. तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळेल. त्याचबरोबर दिवसातील काही वेळ देवासाठीदेखील द्यावा.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )