Marathi News> भविष्य
Advertisement

Mahadhan Rajyog : 'या' राशींचं नशीब चमकवणार महाधन राजयोग; पैशांची चणचण होणार दूर

Mahadhan Rajyog : गुरु ग्रह हा बुद्धी, संतती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. गुरूच्या गोचरमुळे नेतृत्व कौशल्य वाढण्यास मदत होते. अशातच आता गुरुच्या गोचरमुळे एक राजयोग तयार झालाय.

Mahadhan Rajyog : 'या' राशींचं नशीब चमकवणार महाधन राजयोग; पैशांची चणचण होणार दूर

Mahadhan Rajyog : ज्योतिष शास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांची राशी बदलतात. याला ग्रहांचं गोचर असं म्हटलं जातं. कुंडलीतील ग्रहांच्या राशी बदलाने अनेक राजयोग तयार होतात. या राजयोगांचा सर्व राशींच्या लोकांवर परिणाम होताना होतोना दिसतो. अशातच आता गुरुच्या गोचरमुळे एक राजयोग तयार झालाय.

गुरु ग्रहामुळे महाधन राजयोग 

महागुरू मेष राशीत विराजमान आहेत. बृहस्पति मेष राशीत असल्याने यावेळी अनेक योग निर्माण झाले आहेत.  कुंडलीतील दुसरे घर वित्त घर म्हणून ओळखलं जातं. हा 11 आर्थिक लाभाची भाव आहे. जेव्हा या दोन्हींचा एकत्रितपणे संबंध असतो तेव्हा धन योग तयार होतो. अशा स्थितीत महाधन योग तयार झाला असून काही राशींच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. 

18 महिने होणार या राशींच्या व्यक्तींना लाभ

गुरु ग्रह हा बुद्धी, संतती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. गुरूच्या गोचरमुळे नेतृत्व कौशल्य वाढण्यास मदत होते. देव गुरु गुरु एप्रिल महिन्यात उदय झाला असून काही राशीच्या लोकांना 18 महिने त्याचे फायदे मिळतील. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

मेष रास

गुरूचा उदय मेष राशीसाठी शुभ मानला जातोय. यावेळी तुमच्यामध्ये साकारात्मक उर्जेचा संचार होऊ शकतो. गुंतवणुकीचाही तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुम्ही ठरवलेली सर्व कामं पूर्ण होऊ शकणार आहे. कामाच्या ठिकाणी सर्व गोष्टी मनाजोग्य घडण्याची शक्यता आहे. घरात खूप पैसा येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी बृहस्पतिचा उदय खूप शुभ मानला जातो. या काळात तुमची वाणी तुम्हाला भरपूर फायदा देऊन जाणार आहे. या राजयोगाचा लाभ 18 महिन्यांपर्यंत मिळू शकणार आहे. शोध करणाऱ्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असणार आहे. शांती आणि समृद्धी प्राप्त होणार आहे.

सिंह रास

सिंह राशीसाठी बृहस्पतिचा उदय शुभ मानला जातो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होणार आहे. धनप्राप्तीचे योग बनण्याची चिन्ह आहेत. नवीन स्रोतातून धनलाभ होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीचे फायदे मिळतील. जुन्या केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये काही अडचण असेल तर ते दूर होणार आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More