Marathi News> भविष्य
Advertisement

महागोचर : पुढील 140 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांवर शनिची कृपा, धनसंपत्तीसह मिळणार मोठे यश

Shani Vakri 2023 effects on zodisc signs: शनी वक्री झाल्यामुळे काही राशींवर याचा मोठा प्रभाव दिसून येणार आहे. आता 4 नोव्हेंबरपर्यंत शनीची उल्‍टी चाल यामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार आहे.

महागोचर : पुढील 140 दिवस 'या' 5 राशीच्या लोकांवर शनिची कृपा, धनसंपत्तीसह मिळणार मोठे यश

Vakri Shani 2023 Kumbh Rashi : महागोचर झाले आहे. 17 जूनच्या रात्री शनी कुंभ राशीत वक्री झाला आहे. आता 4 नोव्हेंबरपर्यंत शनी उल्‍टी चाल करणार आहे. त्यामुळे सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल.  शनीच्या स्थितीत थोडा बदल देखील ज्योतिषशास्त्रात खूप प्रभावी मानला जातो. जेव्हा जेव्हा शनी गोचर होतो किंवा त्याचा मार्ग बदलतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. शनिवारी रात्री, शनी वक्री झाला आहे. कुंभ राशीतील शनी आता 4 नोव्हेंबर 2023 रोजी वक्री होईल. शनीच्या वक्री होण्यापासून ते शनी प्रत्यक्ष होईपर्यंतचे हे 140 दिवस सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव टाकतील. 12 पैकी 5 राशीच्या राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांसाठी शनीची वक्रदृष्टी चांगला परिणाम करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना धनसंपत्ती आणि यश प्राप्ती होईल.

शनी वक्री 2023  

मेष : 

शनी वक्री होत असल्याने त्याचा मेष राशींच्या लोकांनावर चांगला परिणाम होणार आहे. त्यामुळे धन आणि उत्पन्नाचा मार्ग सापडणार आहे. मेष राशीच्या लोकांवर शनीचा शुभ प्रभाव राहील. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होऊ शकते. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढीला वेग मिळेल. उच्चपदस्थ लोकांशी संबंध निर्माण होतील. 

वृषभ :  

या राशींच्या लोकांनासाठी शनी वक्री होण्यामुळे चांगला लाभ मिळणार आहे. शनीची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठीही शुभ असणार आहे. या राशींच्या लोकांमध्ये करिअरमध्ये प्रगती होईल. अचानक कुठून तरी पैसे मिळतील. उत्पन्नात जोरदार वाढ होईल. मात्र, कामाचा ताण आणि थकवा वाढेल. मालमत्तेशी संबंधित समस्या दूर होतील. 

मिथुन : 

सध्या महागोचर  झाले आहे. शनीची वक्री झाल्याने याचा चांगला लाभ या राशींच्या लोकांना होणार आहे. वक्री शनी तुम्हाला परदेशात राहण्याची किंवा मोठ्या कंपनीत नोकरी करण्याची संधी देऊ शकतो. विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरी-व्यवसायासाठी काळ चांगला आहे. उत्पन्न वाढेल. 

कन्या :

शनीची वक्रदृष्टी कन्या राशीच्या लोकांना व्यवसाय-नोकरीमध्ये भरपूर लाभ देईल. प्रत्येक कामात यश मिळेल. उत्पन्न वाढेल. काही महत्त्वाच्या कामासाठी कर्ज घेऊ शकता. 

धनु :

शनीची वक्री चाल गती धनु राशीच्या लोकांना खूप लाभ देऊ शकते. तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढतच जाईल. तुमचे काम स्वतःच होईल. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

Read More