Marathi News> भविष्य
Advertisement

Surya gochar: सूर्य-मंगळाच्या युतीने बनणार महापुरुष योग; 'या' राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

Surya gochar 2023: 17 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. सूर्याने दुपारी 01:07 वाजता गोचर केलं असून सूर्याच्या राशीतील बदल विशेष असणार आहे. यावेळी मंगळ ग्रह आधीच वृश्चिक राशीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोग झाला आहे. 

Surya gochar: सूर्य-मंगळाच्या युतीने बनणार महापुरुष योग; 'या' राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार

Surya gochar 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एतका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी एकाच राशीत दोन ग्रहांचा संयोग होतो. यावेळी दोन ग्रहांच्या युतीने खास राजयोग देखील तयार होतो. सूर्य ग्रह दर महिन्याला भ्रमण करतो. एका वर्षात राशी चक्र पूर्ण करतो. 

17 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. सूर्याने दुपारी 01:07 वाजता गोचर केलं असून सूर्याच्या राशीतील बदल विशेष असणार आहे. यावेळी मंगळ ग्रह आधीच वृश्चिक राशीत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोग झाला आहे. या संयोगामुळे महापुरुष राजयोग निर्माण झाला आहे. हा राजयोग काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. जाणून घेऊया 'या' राशी कोणत्या आहेत. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण शुभ असू शकणार आहे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. प्रेम व्यक्त करून यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते. तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवू शकता. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन आनंददायी राहणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून हे गोचर चांगलं असून मंगळासोबत झालेली युती फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये विशेष फायदा होणार आहे.

मीन रास

सूर्य आणि मंगळाची युती मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकणार आहे. यावेळी जुन्या समस्यांपासून आराम मिळणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी व्यवस्थित वातावरण राहील. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More