Marathi News> भविष्य
Advertisement

Mangal Ketu Yuti: ऑक्टोबर महिन्यात होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशींचा कठीण काळ सुरु

Mangal Ketu Yuti: अनेकदा ग्रहांचा संयोग काही राशींसाठी शुभ आणि अशुभ ठरतो. मंगळ-केतूचा हा संयोग काही लोकांसाठी शुभ ठरणार नाही. केतू आणि मंगळाच्या या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे. 

Mangal Ketu Yuti: ऑक्टोबर महिन्यात होणार मंगळ-केतूची युती; 'या' राशींचा कठीण काळ सुरु

Mangal Ketu Yuti: ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रहांना एक विशेष स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये राहु आणि केतू या दोन्ही ग्रहांना मायावी ग्रह म्हणून संबोधलं जातं. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये हे दोन्ही ग्रह गोचर करणार आहेत. केतू 30 ऑक्टोबर तूळ रास सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी केतू आणि मंगळ ग्रहाचा संयोग होणार आहे.

दरम्यान अनेकदा ग्रहांचा संयोग काही राशींसाठी शुभ आणि अशुभ ठरतो. मंगळ-केतूचा हा संयोग काही लोकांसाठी शुभ ठरणार नाही. केतू आणि मंगळाच्या या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

वृषभ रास (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी केतू पाचव्या घरात प्रवेश करेल. या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि केतूचा संयोग शुभ ठरणार नाही. रिलेशनशिपमध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. नोकरी बदलण्याची घाई करू नका. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना यावेळी कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहावे लागेल. यावेळी विचार न करता कोणालाही पैसे उधार देऊ नका. पत्नी आणि सासरच्या लोकांशी वाद होऊ शकतो. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येण्याची शक्यता आहे.  करिअरमध्येही काही चढ-उतार येऊ शकतात. विनाकारण रागराग करणं टाळा. 

कन्या रास (Virgo)

मंगळ आणि केतू यांच्या संयोगामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनातही तुमचा तणाव वाढू शकतो. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात आणि जोडीदारासोबत कलहामुळे मन अस्वस्थ राहील. आर्थिक परिस्थिती बिघडू शकणार आहे. तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो.  

मिथुन रास (Gemini) 

या राशीच्या लोकांसाठी मंगळ-केतूचा संयोग शुभ नसणार आहे. तुम्हाला काही प्रकारच्या समस्यांना सामोरं जावे लागेल. या काळात तुम्हाला कुठूनही पाठिंबा मिळणार नाही. या काळात तुम्हाला तुमचे लक्ष्य साध्य करण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करावा.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More