Marathi News> भविष्य
Advertisement

निर्जला एकादशीला बुध - गुरु युतीसह अनेक दुर्मिळ संयोग! 5 राशीच्या लोकांवर बरसणार विष्णुची कृपा, होणार आर्थिक लाभ

Nirjala Ekadashi 2025 : धार्मिक शास्त्रात निर्जला एकादशी ही सर्वात शक्तिशाली एकादशी मानली जाते. या दिवशी भाविक 24 तास कठोर उपवास केला. यंदा यादिवशी अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. याचा सकारात्मक परिणाम 5 राशीच्या लोकांवर होणार आहे. यात तुमची रास आहे का पाहा.  

निर्जला एकादशीला बुध - गुरु युतीसह अनेक दुर्मिळ संयोग! 5 राशीच्या लोकांवर बरसणार विष्णुची कृपा, होणार आर्थिक लाभ

Nirjala Ekadashi 2025 : निर्जला एकादशीला भद्रा राजयोगाचे शुभ संयोग जुळून आला आहे. निर्जला एकादशीच्या शुभ संयोगात बुध आपल्या राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा बुध मिथुन राशीत प्रवेश करतो तेव्हा वर्षातील सर्वात मोठा राजयोग, भद्रा राजयोग निर्माण होणार आहे. ग्रहांचा हा संयोग 5 राशीच्या लोकांसाठी अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात इच्छित संधी प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशींना अचानक मोठ्या प्रमाणात पैसा मिळणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात भरपूर यश प्राप्त होणार आहे. कुटुंबातही खूप आनंद लाभणार आहे. 

वृषभ रास 

या राशीच्या लोकांसाठी निर्जला एकादशी भाग्यशाली ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात शुभता वाढणार आहे. घरात लग्न, किंवा धार्मिक कार्यक्रम यासारख्या शुभ कार्य असणार आहे. घर किंवा वाहन गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल राहणार आहे. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने राहणार आहेत. विशेषतः जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर सुसंवाद ठेवा. शेअर बाजार, व्यापार किंवा लहान गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठी अचानक नफा मिळणार आहे. आरोग्यात सुधारणा पाहिला मिळणार आहे. जुनाट आजारांपासून आराम मिळेल आणि मानसिक ताण कमी होणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार आहे. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळणार आहे. 

सिंह रास 

या लोकांसाठी बुध ग्रहाचे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात कार्यक्षमतेने निर्णय घेतल्यास नफा मिळणार आहे. विशेषतः व्यवसायात गुंतलेल्या लोकांना मोठ्या नफ्याच्या संधी प्राप्त होणार आहे. नवीन क्लायंट किंवा करार अंतिम असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ, पदोन्नती किंवा एखाद्या विशेष प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्ही वाढ पाहिला मिळणार आहे. आर्थिक बाबतीत, बुध ग्रहाच्या या संक्रमणामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. विशेषतः शेअर बाजार किंवा डिजिटल माध्यमांमधून उत्पन्न मिळणार आहे. तुम्हाला भावंड आणि मित्रांकडून पाठिंबा प्राप्त होणार आहे. मुलांकडून समाधानकारक बातम्या मिळतील आणि प्रेमसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि बळकटी देखील येणार आहे. 

कन्या रास 

कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे हे संक्रमण अत्यंत शुभ आणि फलदायी ठरणार आहे. कारण बुध तुमच्या राशीचा तसेच कर्मभावाचा स्वामी आहे आणि सध्या तो स्वतःच्या घरात म्हणजेच दहाव्या घरात भ्रमण करत आहे. ही परिस्थिती कार्यक्षेत्र, करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने खूप अनुकूल मानली जाणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा, पदोन्नती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे. ज्यामुळे भविष्यात त्यांच्या करिअरला नवीन उंची प्राप्त होणार आहे. व्यावसायिक लोक नियोजनबद्ध पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढ होणार आहे. ग्राहक आणि भागीदारांकडून त्यांना लाभ मिळणारा आहे. तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहात. ज्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा वाढणार आहे. हे संक्रमण आर्थिकदृष्ट्या देखील शुभ राहणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार असून, तसंच प्रलंबित कामांमधून पैसे मिळणार आहे. 

वृश्चिक रास 

या लोकांसाठी, बुध राशीचे हे संक्रमण आयुष्यात अचानक लाभ होणार आहे.  अनपेक्षित आर्थिक लाभ आणि गुप्त स्रोतांकडून पैसे मिळणार आहे. विमा, कर, संशोधन, शेअर बाजार किंवा गूढ ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः शुभ असणार आहे. करिअरच्या बाबतीत, हे संक्रमण तुम्हाला अचानक प्रगती, बोनस किंवा पदोन्नती देणार आहे. वाणीचा स्वामी, गुरु आणि बुध यांचा दृष्टिकोन तुमच्या बोलण्यात संयम आणि समजूतदारपणा आणण्यास मदत करणार आहे. सामाजिक क्षेत्रात तुमचा सहभाग वाढणार आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी अनपेक्षित आर्थिक आणि करिअरच्या संधींमधून लाभ देणारा ठरणार आहे. 

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी, बुध ग्रहण रोग, कर्ज, शत्रू आणि स्पर्धा यासारख्या बाबींमध्ये विजय मिळवण्यात तुम्हाला मदत करणार आहे. तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यालयात किंवा व्यवसायात समस्या कार्यक्षमतेने सोडवणार आहात. हा काळ विशेषतः त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही सरकारी सेवेशी, बँकिंग, लेखा किंवा विश्लेषणात्मक क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून, हे संक्रमण तुम्हाला नवीन उत्पन्न योजनांचा विचार करण्यास आणि जुन्या कर्जातून मुक्त होण्यास मदत करणार आहे. स्पर्धा परीक्षा किंवा कायदेशीर बाबींमध्ये यश मिळणार आहे. तसंच तुमचे शत्रू किंवा विरोधकांवर मात करणार आहे. जर तुम्ही लेखन, पत्रकारिता, शिक्षण किंवा साहित्याशी संबंधित असाल तर तुमच्या प्रतिभेला समाजात विशेष मान्यता मिळणार आहे. 

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More