Marathi News> भविष्य
Advertisement

Budh Margi: नववर्षाच्या सुरुवातीलाच बुध होणार मार्गस्थ; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budh Planet Margi: पुढच्या वर्षी म्हणजेच 2 जानेवारी 2024 रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये मार्गस्थ होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. यावेळी काही अशा आहेत राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. 

Budh Margi: नववर्षाच्या सुरुवातीलाच बुध होणार मार्गस्थ; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Budh Planet Margi: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वेळोवेळी मार्गस्थ आणि वक्री होतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. ग्रहांचा राजकुमार बुध हा पुढच्या वर्षी मार्गस्थ होणार आहे. याचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.

पुढच्या वर्षी म्हणजेच 2 जानेवारी 2024 रोजी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये मार्गस्थ होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. यावेळी काही अशा आहेत राशी आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. या लोकांना विशेषत: बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाचं मार्गी होणं कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

तूळ रास (Tula Zodiac)

बुध मार्गी असणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यवसायात तुम्ही नवीन योजनेअंतर्गत काम कराल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. धार्मिक किंवा व्यवसायाशी संबंधित कारणासाठी प्रवास करू शकता.  यावेळी नशीब तुम्हाला साथ देणार आहे. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

बुध ग्रहाचं मार्गस्थ होणं असणे तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. वेळोवेळी पैसे मिळत राहणार आहेत. जे लोक व्यावसायिक आहेत त्यांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने तुमच्यासाठी शुभ ठरेल. या लोकांचा प्रभाव कामाच्या ठिकाणी वाढू शकतो. 

मीन रास (Meen Zodiac)

2024 च्या सुरुवातीला बुधाचं मार्गस्थ होणं तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. बुध ग्रह तुमच्या राशीच्या चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे ज्यांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांना नशीब यश मिळवून देणार आहे. उत्पन्नाच्या नवीन शक्यताही निर्माण होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळेल. सुखासाठी पैसा खर्च करू शकता.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More