Marathi News> भविष्य
Advertisement

Numerology : ‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी, सर्वांना करतात मदत

हाताची पाचही बोट सारखी नसतात. तसंच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा सारखा नसतो. पण अंकशास्त्रानुसार जन्मतारखेनुसार आपण त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेऊ शकतो. आज आपण विशेष तीन तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचे स्वभाव जाणून घेणार आहोत.     

Numerology : ‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी, सर्वांना करतात मदत

ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रदेखील हे एक शास्त्र आहे. या अंकशास्त्रानुसार तुमच्या जन्मतारेखानुसार तुमचा कुठल्या ग्रहाशी संबंध आहे, तुमचा स्वभाव आहे, बरंच काही सांगू शकतो. तुमच्या भविष्याचा वेधही या अंकशास्त्रातून सांगण्यात आलाय. अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि भविष्याबद्दल माहिती सांगण्यात येते. जर आपल्याला एखाद्याच्या वर्तनाबद्दल, जीवनाबद्दल किंवा भविष्याबद्दल कोणतीही माहिती हवी असेल तर ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र मदत करतो. 

अंकशास्त्रात ज्या संख्यांद्वारे गणना केली जाते. ते व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मिळवले जातात. यासाठी, जन्मतारखेचे सर्व अंक एक अंकी उत्तर मिळेपर्यंत जोडले जातात. भेटल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? आयुष्यात त्याला कोणत्या प्रकारच्या परिस्थितींना तोंड द्यावे लागेल? त्याचे भविष्य कसे असेल याबद्दल माहिती मिळू शकते. (Numerology People born on 9 18 27 quarrelsome but they take care of their partner and help everyone)

मूलांक 9 (अंकशास्त्र)

आज आम्ही तुम्हाला अशाच काही तारखेला जन्मलेल्या लोकांबद्दल सांगत आहोत, ज्यांचा स्वभाव भांडखोर असतो. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला होतो. त्यांचा मूळ क्रमांक हा 9 असतो. 

भांडखोर पण काळजी घेणारा

महिन्याच्या या 3 तारखेला जन्मलेले लोक, ते प्रत्येक छोट्या गोष्टीवरून भांडायला तयार असतात. हे लोक लढण्यात कधीही मागे राहत नाहीत. मात्र, ते नेहमीच त्यांच्या प्रियजनांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते कधीही कोणालाही दुःखी करू इच्छित नाहीत.

हेसुद्धा वाचा - Numerology : ‘या’ जन्मतारखेची लोक असतात श्रीमंत! जगतात विलासी आयुष्य

चांगले सल्लागार 

या राशीचे लोक खूप हुशार असतात आणि जीवनातील प्रत्येक निर्णय ते हुशारीने घेतात. त्यांचा सल्ला खूप प्रभावी आहे. जर कोणी त्यांना कोणत्याही विषयावर सल्ला मागितला तर ते त्याला चांगले मार्गदर्शन करतात.

करिअरमधील धोके पत्करतात

हे लोक त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतात. चांगल्या आणि उत्कृष्ट करिअरसाठी ते कधीही जोखीम घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना कठीण खेळ कसे खेळायचे हे चांगले माहित आहे आणि ते प्रत्येक अडथळ्यावर मात करतात.

उपयुक्त स्वभाव

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना नशीबाची साथ मिळते. नशिबामुळे ते सर्व अडचणींवर सहज मात करतात. त्यांना इतरांना मदत करण्याची आवड असते, हे त्यांचं वैशिष्ट्य असतं. ते महत्त्वाकांक्षेने परिपूर्ण असतात आणि आत्मविश्वासाने आयुष्यात पुढे वाटचाल करतात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More