Marathi News> भविष्य
Advertisement

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात

October Grah Gochar 2023: ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात.

October Grah Gochar : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रह करणार गोचर; शुक्र-सूर्य करणार 'या' राशींवर पैशांची बरसात

October Grah Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशी बदल करतात. असंच आगामी ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह त्यांच्या चालीमध्ये बदल करणार आहेत. अशा परिस्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही ना काही बदल घडणार आहे. 

ऑक्टोबर महिन्यात सूर्य, शुक्र, राहू, केतू आणि बुध हे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल कऱणार आहेत. ज्योतिषांच्या मते, ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अशा हालचाली काही राशींना विशेष लाभ देऊ शकतात. ऑक्‍टोबर महिन्यात कोणते ग्रह कोणत्या कधी गोचर करणार आहे ते पाहुयात.

कन्या राशीत बुधाचं गोचर

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध, बुद्धीचा कारक आणि ग्रहांचा राजकुमार येत्या 01 ऑक्टोबर 2023 ला गोचर करणार आहे. या दिवशी रात्री 08:29 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

सिंह राशीमध्ये शुक्राचं गोचर 

शुक्र ग्रह 02 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 12:43 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

तूळ राशीत मंगळाचं गोचर

मंगळ ग्रह 03 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 05:12 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

तूळ राशीत सूर्याचं गोचर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी सूर्य हा मुख्य ग्रह मानला जातो. ग्रहांचा राजा सूर्य 18 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:18 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे.

तूळ राशीमध्ये बुधाचं गोचर 

बुध ग्रह कन्या राशीतून 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01:06 वाजता तूळ राशीत प्रवेश करेल.

मीन राशीत राहुचं गोचर

पापी ग्रह राहु वक्री चाल चालणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:13 वाजता मेष या राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे

कन्या राशीत केतू संक्रमण

राहू व्यतिरिक्त केतू देखील राशीत बदल करणार आहे. केतू 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2.13 वाजता सुमारे दीड वर्षांनी शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये सूर्य आणि बुध ग्रह आधीच उपस्थित आहेत.

ग्रहांच्या गोचरमुळे या राशीच्या व्यक्तींना मिळणार लाभ

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, राहू, केतू या ग्रहांच्या गोचरमुळे विशेष लाभ मिळू शकणार आहेत. या काळात नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. उच्च अधिकारी कामावर खूश होऊन त्यांना पदोन्नतीसह मोठ्या जबाबदाऱ्या देऊ शकतात. ज्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली असेल त्यांना अनेक पटींनी जास्त नफा मिळू शकतो. अचानक काहींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More