Marathi News> भविष्य
Advertisement

Palmistry : तुमच्या हातावर जर 'या' रेषा असतील तर सर्तक रहा, कारण...

आपल्या प्रत्येकाच्या हातावर जीवनरेषा, भाग्यरेषा, आयुषरेषा, मस्तिष्करेषा तसंच हृदयरेषा यांसारख्या प्रमुख रेषा असतात. 

Palmistry : तुमच्या हातावर जर 'या' रेषा असतील तर सर्तक रहा, कारण...

मुंबई : हातावरील रेषा, चिन्हं आणि एकंदरीत बनावट पाहून ती व्यक्ती किती भाग्यशाली आहे याबाबत जोतिषशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे करिअर, धन-दौलत, पैसा, कुटुंबाविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आपल्या प्रत्येकाच्या हातावर जीवनरेषा, भाग्यरेषा, आयुषरेषा, मस्तिष्करेषा तसंच हृदयरेषा यांसारख्या प्रमुख रेषा असतात. 

आपल्या हातावरील रेषांसोबतच काही चिन्हंही असतात. ही चिन्हं आर्थिक स्थिती, पैसा यासंदर्भात सतर्कतेचा इशारा देतात. ज्या व्यक्तींच्या तळहातावर अशी चिन्हे असतात, त्यांनी सतर्क राहावे. तर आज जाणून घेऊया नेमकी कोणती चिन्हं सतर्कतेचा इशारा देतात ते.

यव चिन्ह

यव चिन्ह म्हणजे गव्हाच्या दाण्यासारखे चिन्ह असणं. काही व्यक्तीच्या तळहातावरील आरोग्य रेषेच्या सुरुवातीला आणि शेवटाला यव चिन्ह असतं. यव चिन्ह असण्याचा संकेत अनुकूल मानला जात नाही. असं मानलं जातं की, आरोग्य रेषेवरील यव चिन्हामुळे तुमच्याकडे येणारा पैसा टिकत नाही. 

रेषा इतर रेषेला छेद देत असेल तर

हस्तरेषाशास्त्रानुसार, तळहातावरील शनी रेषेला कोणतीही इतर रेषा छेद देत असेल तरीही हातात पैसा टिकत नाही. अशा व्यक्तींनी भरपूर मेहनत करूनही त्यांना अपेक्षेप्रमाणे पैसा मिळत नाही. 

तळहातावर सूर्यरेखा नसणं

असं मानलं जातं की, ज्या व्यक्तींच्या तळहातावर सूर्याची रेखा नसते, त्यांना आयुष्यात अनेकवेळा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या अशा व्यक्तींना नेहमीच पैशांची अडचण भासू शकते.

(यामध्ये दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे असा दावा आम्ही करत नाही. ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि धर्मनिरपेक्ष श्रद्धेवर आधारित आहे.)

Read More