Marathi News> भविष्य
Advertisement

सूर्य-शुक्रच्या युतीमध्ये या राशीच्या व्यक्तींना राहावं सावधान!

ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा अनोखा संयोग होणार आहे.

सूर्य-शुक्रच्या युतीमध्ये या राशीच्या व्यक्तींना राहावं सावधान!

मुंबई : ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा अनोखा संयोग होणार आहे. 31 ऑगस्टला शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. जिथे सूर्य आधीच उपस्थित असेल. ज्योतिषशास्त्रात शुक्र आणि सूर्य हे दोन्ही ग्रह शुभ मानलं जातात. पण त्यांचा संयोग अशुभ मानला जातो. 

हा काळ फारसा अनुकूल आहे असं म्हणता येणार नाही. सिंह राशीमध्ये हे दोन ग्रह 17 सप्टेंबरपर्यंत एकत्र राहणार आहेत. जाणून घ्या या ग्रहांच्या संयोगामुळे कोणत्या राशींना त्रास होण्याची शक्यता आहे.

मकर 

या राशीच्या लोकांसाठी हा संयोग विशेष खास मानला जात नाही. या काळात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शिक्षण क्षेत्राशी निगडीत स्थानिकांना थोडेसं भरकटलेलं वाटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, खूप सावधगिरी बाळगावी लागेल.

मीन 

ही जोडी फारशी अनुकूल असणार नाही. तब्येत बिघडू शकते त्यामुळे सतर्क रहा. तुम्हाला पोट किंवा डोळ्यांशी संबंधित काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विवाहित लोकांच्या नात्यात कटुता येण्याची शक्यता आहे. तुमचा खर्च अचानक वाढू शकतो. नोकरीमध्ये तुम्हाला काही अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होऊ शकते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More