Premanand Ji Maharaj: कुणीही संकटात सापडले की देवाचा धावा करतात. देवाचे नामस्मरण करतात. कठिण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी देवाची प्रार्थना करतता. पण खरचं देव तुमच्या सोबत आहे की नाही? प्रेमानंद महाराजांनी सांगितले आहे की हे ओळखायचे कसं? तुम तुमच्या सोबत असे तर नेमके कोणते संकेत मिळता. हे संकेत काय आहेत जाणून घ्या.
देव तुमच्या सोबत असेल तर 8 प्रकारचे संकेत मिळातात. हे संकेत म्हणजे तुमच्यावर देवाची कृपादृष्टी आहे असं प्रेमानंद जी महाराज म्हणतात. प्रेमानंद जी महाराजांच्या मते, देव तुमच्यासोबत आहे याची पहिली खूण म्हणजे गंभीर गुन्हे करणाऱ्यांबद्दलही तुमच्या मनात करुणा निर्माण होते. तुम्ही कोणावरही रागावत नसला किंवा क्षमा करा असे गुण असतील तर देवाची तुमच्यावर कृपा आहे.
जो माणूस दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष शोधत नाही, जो कधीही कोणामध्ये दोष शोधत नाही असे गुण दर्शवतात की देव तुमच्यासोबत आहे. ज्या व्यक्तीवर देवची कृपादृष्टी असते तो पवित्र राहण्याचा प्रयत्न करतो. असा व्यक्ती नेहमी स्वच्छ कपडे परिधान करतो. हा व्यक्ती फक्त स्वच्छ कपडे परिधान करत नाही तर याचे मन देखील शुद्ध असते. जे त्याच्या आचरणातून आणि कृतीतून दिसते. प्रामाणिकपण हे आंतरिक शुद्धतेच प्रमुख लक्षण आहे.
अनेकदा बरेच जण विविध कारणे देत धार्मिक कार्यक्मात सहभागी होत नाहीत. मात्र, ज्यांच्यावर देवाची कृपादृष्टी असते. ते कोणत्याही परिस्थितीत धार्मिक कार्यक्रमांमध्ये न चुकता सहभागी होतात. कितीही संकटे आले तरी ते त्यांचा सामना करतात कारण देव त्यांच्यासोबत असतो असे प्रेमानंद महाराज सांगतात. ज्या व्यक्तीवर देवाची कृपा असते तो स्वतःच्या सुखाचा विचार करण्यापूर्वी इतरांच्या सुखाचा विचार करतो.
जे लोक धार्मिक प्रवचन, कीर्तन, भजन असा विविध मार्गाने देवाची भक्ती करतात. मात्र, याबदल्यात ते कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा इतर भेटवस्तू घेत नाहीत त्यांच्यावर देवाची कृपा असते. प्रेमानंदजी महाराजांच्या मते, आदर, सन्मान, कीर्ती आणि पद मिळाल्यानंतरही जे कोणत्याही प्रकारचा गर्व दाखवत नाहीत. उलट प्रणाम, नमस्ते, विजयी होऊनही संतुष्टमनाने जीव जगतात देव त्यांच्या सोबत असतो. प्रेमानंदजींच्या मते, जेव्हा मनात करुणा आणि मैत्री असते आणि कोणाबद्दलही आसक्ती नसते, तेव्हा खऱ्या अर्थाने देव अशा लोकांसोबत असतो.