Marathi News> भविष्य
Advertisement

Rahu Gochar 2023 : ऑक्टोबरपर्यंत या राशी जगणार राजासारखं आयुष्य, राहू गोचर करणार मालामाल

 Rahu Gochar 2023 : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहू ग्रह मेष राशीत असणार आहे. राहूच्या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम देखील मिळणार आहे.

Rahu Gochar 2023 : ऑक्टोबरपर्यंत या राशी जगणार राजासारखं आयुष्य, राहू गोचर करणार मालामाल

Rahu Gochar 2023 :  वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यानुसार, 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत राहू ग्रह मेष राशीत असणार आहे. यावेळी सर्व राशींवर याचा सकारात्मक तसंच नकारात्मक प्रभाव पडतो. राहू ग्रहाला मायावी ग्रह मानलं जातं. मात्र राहूच्या गोचरचा काही राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम देखील मिळणार आहे.

अशुभ ग्रह राहू मेष राशीमध्ये असून यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार राहू हा शनी नंतर सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. चला जाणून घेऊया 30 ऑक्टोबरपर्यंत कोणत्या राशींना राहूच्या गोचरचा फायदा होणार आहे

कर्क रास

यावेळी राहू कर्क राशीच्या दहाव्या घरात आहे. या काळात रहिवाशांना व्यवसायात फायदा होईल. बँकेच्या क्षेत्राशी निगडित असलेल्यांनाही प्रगतीच्या नव्या संधी मिळणार आहे. इतर माध्यमातून पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. व्यापारात तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळेल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी राहु गोचर शुभ मानलं जातं. राहूच्या गोचरमुळे तुम्हाला मोठा पण लाभदायक प्रवास करावा लागणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या काळात खर्चात वाढ होईल, परंतु वेळेनुसार त्यावर नियंत्रण ठेवता येईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी राहू गोचर शुभ असणार आहे. यावेळी प्रत्येक क्षेत्रात पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी वरीष्ठ तुमच्यावर खूश असतील. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होण्याची शक्यता आहे. बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. 

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत चांगले परिणाम मिळणार आहेत. या काळात आत्मविश्वास वाढणार आहे. नोकरीत बदल होण्याचीही दाट शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चांगली होणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More