Marathi News> भविष्य
Advertisement

राहु ग्रहामुळे दीड वर्ष 3 राशींवर ओढवणार मोठं संकट

राहु ग्रहामुळे 12 पैकी 3 राशी अडचणीत, दीड वर्ष घ्यावी लागणार काळजी... पाहा तुमची रास यामध्ये तर नाही?

राहु ग्रहामुळे दीड वर्ष 3 राशींवर ओढवणार मोठं संकट

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार राहुला चांगला ग्रह मानला जात नाही. त्याला मायावी ग्रह असं देखील म्हटलं जातं. या ग्रहाची चाल ओळखणं कठीण असतं. आपल्या आयुष्यातील घटनांचा संबंध या ग्रहाशी असतो असं म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार 12 एप्रिल रोजी राहु आपली दिशा बदलणार आहे. त्याचा थेट परिणाम 3 राशींवर होणार आहे. 

मेष : या राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार आहे. या राशीवर नकारात्मक प्रभाव मिळणार आहेत. आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय या राशीच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे. 

तुळ : अचानक समस्या ओढवण्याची शक्यता आहे. आपलं लक्ष्य गाठण्यामागे अनेक अडचणी येऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

मकर : या राशीच्या व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. नोकरी आणि रोजगारामध्ये उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. रिलेशनशिप खराब होऊ शकतं. वाणीमध्ये दोष जाणवू शकतात. 

या राशीच्या लोकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पैसे जपून वापरा कारण अचानक आर्थिक चणचण जाणवू शकते. 

Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.  

Read More