Marathi News> भविष्य
Advertisement

Ram Navami 2025 Date : 5 की 6 एप्रिल, कधी आहे राम नवमी? जाणून घ्या योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त

Ram Navami 2025 Date : राम नवमी चैत्र शुक्ल नवमी तिथीला देशभरात साजरी करण्यात येते. या वर्षी रामनवमी 5 की 6  एप्रिल नेमकी कधी साजरी करायची आहे याबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे. अशात रामनवमीची योग्य तिथी, पूजा पद्धत, शुभ मुहूर्त आणि उपाय जाणून घेऊया.

Ram Navami 2025 Date : 5 की 6 एप्रिल, कधी आहे राम नवमी? जाणून घ्या योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त

Ram Navami 2025 Date : दरवर्षी देशभरात राम नवमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. प्रभू श्रीरामांचा जन्मसोहळा म्हणजेच राम नवमी, श्रीरामांचं चरित्र हे एक आदर्श पुरूषाचे चरित्र आहे. श्रीरामांनी जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे त्याचे स्मरण या निमित्याने करून त्या गुणांचा अंगिकार करावा हा श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्याचा उद्देश आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा अवतार झाला अशी धार्मिक श्रद्धा आहे. म्हणूनच दरवर्षी या तिथीला रामनवमी म्हणून साजरी करण्यात येते. 

रामनवमीच्या दिवशी पूजा केल्याने भक्ताला जीवनात सुख-समृद्धी नांदते, असा विश्वास आहे. यावेळी रामनवमीच्या तारखेबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे, म्हणून आम्ही तुम्हाला रामनवमीची योग्य तिथी आणि शुभ मुहूर्तासह पूजा विधी सांगणार आहोत. 

चैत्र नवरात्रीशी श्रीरामाचा काय संबंध आहे?

शास्त्रीय श्रद्धा आणि धार्मिक परंपरेनुसार, भगवान श्रीराम यांचा चैत्र नवरात्राशी खोल संबंध आहे. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान राम मानवाच्या रूपात या पृथ्वीवर अवतार घेत होते अशी पौराणिक मान्यता आहे. म्हणून या तिथीला रामनवमी म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान श्रीरामांचा जन्म मध्यान्ह कर्क लग्नात आणि पुनर्वसु नक्षत्रात झाला होता. म्हणूनच रामनवमीच्या दिवशी दुपारी भगवान श्रीरामांची विशेष पूजा करण्यात येते. 

राम नवमी 2025 योग्य तिथी 

पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी 05 एप्रिल रोजी संध्याकाळी 07:26 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे 06 एप्रिल रोजी संध्याकाळी 07:2 वाजेपर्यंत असणार आहे. अशाप्रकारे, राम नवमीचा उत्सव 06 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. 

राम नवमी 2025 शुभ मुहूर्त

पूजेचा शुभ काळ - 06 एप्रिल सकाळी 11:08 ते दुपारी 01:39

ब्रह्म मुहूर्त - पहाटे 04:34 ते 05:20 पर्यंत

विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते 03:20 पर्यंत

संधिप्रकाश वेळ - संध्याकाळी 06:41 ते 07:03 पर्यंत

निशिता मुहूर्त - सकाळी 12 ते दुपारी 12:46 पर्यंत

रामनवमीला भगवान रामाची पूजा कशी करावी?

शास्त्रांनुसार, रामनवमीच्या दिवशी दुपारी योग्य विधींनी भगवान श्रीरामाची पूजा करावी. घरात योग्य ठिकाणी राम दरबाराचे चित्र ठेवा. हे केल्यानंतर, प्रथम भगवान श्री रामांसमोर तुपाचा दिवा लावा. यानंतर, भगवान श्रीरामांना पिवळे कपडे, पिवळी फळे, पिवळी फुले आणि पंचामृत अर्पण करा. या वेळी, भगवान श्रीरामांना तुळशीची पाने देखील अर्पण करा. त्यांना फळे आणि मिठाई द्या. यानंतर, ओम रामाय नम: या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. याशिवाय, या दिवशी घरी रामचरित मानस पाठ करणे शुभ मानले जाते. याशिवाय, या दिवशी पूजेदरम्यान राम रक्षा स्तोत्राचे पठण अतिशय शुभ मानले जाते. 

राम नवमीसाठी उपाय

  • कामात यश मिळविण्यासाठी, रामनवमीच्या शुभ प्रसंगी, भगवान श्री रामाची योग्य पद्धतीने पूजा करा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून आरती करा. त्यांना चंदनाचा टिळा लावा आणि श्री राम स्तुतीचा पाठ करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने भक्ताला त्याच्या सर्व कामात यश मिळते आणि देव प्रसन्न होतो.
  • याशिवाय, रामनवमीच्या दिवशी अन्न आणि पैशाचे दान करणे शुभ मानले जाते. या उपायाचा अवलंब केल्याने साधकाला भगवान श्रीरामांचा आशीर्वाद मिळतो. शिवाय, आनंद आणि समृद्धी देखील वाढते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More