Marathi News> भविष्य
Advertisement

Ramdas Navami 2024 : संत रामदास स्वामी यांची प्रेरणादायी शिकवण आयुष्यात आणेल सकारात्मकता!

Ramdas Navami 2024Message In Marathi : महाराष्ट्राची भूमी ही महान संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. 5 मार्च 2024 ला रामदास नवमी आहे. यादिवशी म्हणजे माघ वद्य नवमी शके 1603 (सन 1681) सज्जनगडावर रामदास समर्थ यांनी देह ठेवला होता. म्हणून या दिवसाला दास नवमी असंही म्हणतात. 

Ramdas Navami 2024 : संत रामदास स्वामी यांची प्रेरणादायी शिकवण आयुष्यात आणेल सकारात्मकता!

Ramdas Navami 2024Message In Marathi : समर्थ रामदासांचं मूळ नाव 'नारायण सूर्याजीपंत कुलकर्णी' (ठोसर) असं होतं. त्यांचा जन्म 1530 इसवी सन 1608 मध्ये महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जांब नावाच्या गावात रामनवमीच्या दुपारी ब्राह्मण कुटुंबात झाला होता. समर्थ रामदासजींच्या वडिलांचं नाव सूर्याजी पंत असून ते  सूर्यदेवाचे उपासक होते. तर आईचं नाव राणूबाई असं होतं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) गुरू होते. समर्थ रामदास यांनी दासबोध नावाचा प्रसिद्ध मराठी ग्रंथ लिहिलाय. रामदास नवमी निमित्त खास शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत. (ramdas navmi 2024 message in marathi whatsapp Shubhecha Status )

सामर्थ्य आहे चळवळीचे
जो जो करील तयांचे,
परंतु तेथे भगवंताचे
अधिष्ठान पाहिजे…
श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…

fallbacks
जितुके काही आपणासी ठावे
तितुके हळूहळू शिकवावे
शहाणे करूनी सोडावे
बहुत जन…
श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…

fallbacks

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥
श्री रामदास नवमीच्या शुभेच्छा…

fallbacks


मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

fallbacks


प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥
श्री समर्थ रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

fallbacks


मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना धर्मता नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥
संत रामदास नवमीनिमित्त हार्दिक शुभेच्छा…

fallbacks

Read More