Marathi News> भविष्य
Advertisement

Sunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा

Ravivar Ke Upay :  रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात.   

 Sunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा

Ravivar Upay : हिंदू धर्मात देवीदेवतांच्या पूजेला विशेष महत्त्वं आहे. प्रत्येक देवाला एक दिवस समर्पित केला गेला आहे. रविवार हा सूर्य देवाचा दिवस आहे. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सुख, संपत्ती आणि कीर्ती मिळते. जर तुमच्या कुंडलीतील सूर्य हा कमजोर असेल तर होणारी कामंदेखील होतं नाहीत. ज्योतिषशास्त्रात आर्थिक प्रगतीसाठी रविवारच्या दिवशी काय उपाय सांगितले आहेत. ते केल्यास तुमच्या सगळ्या समस्यांचं निरासन होऊ शकतं. 

रविवारीचे उपाय

सूर्याची कृपा प्राप्त करण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. तांब्याचा कलशातून पाणी अर्पण करावे. यासोबतच फुले, अक्षता अर्पण कराव्यात. 'ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः' या मंत्राचा अवश्य जप करा. (Ravivar Ke Upay Sunday Upay fame and money remedies 15 January Happy Makar Sankranti 2023)

इच्छापूर्तीसाठी रविवारी वटवृक्षाचे पान आणा आणि त्यावर तुमची इच्छा लिहा. त्यानंतर हे पान वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. 

रविवारी घराच्या बाहेरील दरवाजाच्या दोन्ही बाजूला देशी तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानलं जातं. 

चांगल्या कामासाठी रविवारी घराबाहेर पडणार असाल तर चंदनाचा टिळक लावून निघा. शिवाय लाल कपडे परिधान करा. 

रविवारी झाडू खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी 3 झाडू खरेदी करा. त्यानंतर सोमवारी हे तीन झाडू जवळच्या मंदिरात दान करावे. हा उपाय केल्यास तुमचं भाग्य लवकर उजळेल.

रविवार हा दानासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान करा. 

जीवनात सुख-समृद्धी आणि कीर्ती मिळवायची असेल तर रविवारी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चारमुखी दिवा नक्की लावा. यामध्ये मोहरीचं तेल वापरावे. याचा फायदा तुम्हाला लवकरच मिळेल.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला धन-समृद्धी मिळवायची असेल त्यांनी रविवारी रात्री डोक्यावर दुधाचा ग्लास ठेवून झोपावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते दूध बाभळीच्या झाडाच्या मुळामध्ये अपर्ण करावे. 

Read More