Marathi News> भविष्य
Advertisement

Samsaptak Yog: मार्च महिन्यात बनणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Rajyog 2024: सध्या गुरू ग्रह मेष राशीत आहे. याशिवाय शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दोन ग्रह एकमेकांसमोर आले आहेत. शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार होणार आहे. 

Samsaptak Yog: मार्च महिन्यात बनणार समसप्तक राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Rajyog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे आणि संयोगामुळे खास राजयोग तयार होतात. यावेळी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थान बदलल्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. अशा परिस्थितीत हा मार्च महिना खूप खास असणार आहे. मार्चमध्ये काही ग्रहांच्या भ्रमणामुळे अनेक शुभ-अशुभ राजयोग तयार होत आहेत. 

सध्या गुरू ग्रह मेष राशीत आहे. याशिवाय शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दोन ग्रह एकमेकांसमोर आले आहेत. शुक्र आणि गुरू समोरासमोर आल्याने समसप्तक राजयोग तयार होणार आहे. अशा स्थितीत समसप्तक राजयोग ज्योतिषशास्त्रात विशेष मानला जातो. या राजयोगाच्या निर्मितीमुळे अनेक राशींना फायदा होणार आहे. जाणून घेऊया समसप्तक राजयोगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी समसप्तक राजयोग खूप शुभ ठरणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे अनेक फायदे मिळणार आहेत. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकणार आहेत. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील. लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. 

कर्क रास

या राशीच्या लोकांसाठी समसप्तक योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे या राशीचे लोक जीवनातील सर्व सुखसोयींचा आनंद घेऊ शकणार आहेत. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. या राशीच्या लोकांसाठी मालमत्ता, जमीन आणि नवीन वाहन खरेदी करण्याचीही शक्यता आहे. 

कुंभ रास

या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. याशिवाय अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यासोबतच वडील आणि मित्रांच्या सहकार्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहील.  तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थैर्य आधीच तुमच्या बाजूने आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More