Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Dev : 29 मार्चपासून ‘या’ राशींवर पुढील 7 वर्ष सोसावे लागणार कष्ट; पैशाचं नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता

Shani Sade Sati 2025 : न्यायदेवा आणि कर्माचा दाता ज्याची जाचकाला भीती वाटते, अशा शनिदेव येत्या 29 मार्च 2025 ला आपली राश बदलणार आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर तो कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम तीन राशींच्या आयुष्यात नकारात्मक होणार आहे. आर्थिक संकटापासून आरोग्यची समस्या निर्माण होणार आहे.     

Shani Dev : 29 मार्चपासून ‘या’ राशींवर पुढील 7 वर्ष सोसावे लागणार कष्ट; पैशाचं नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता

Shani Sade Sati 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रहांची आपली अशी खासियत आहे. शनिदेव आणि राहू हे क्रूर ग्रह मानले जातात. शनिदेव हा न्यायदेवता आणि कर्मदाता मानला गेला आहे. तो जाचकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देत असतो. शनि हा ग्रह सर्वात संथ गतीने आपली चाल बदलतो. तो एका राशीत तब्बल अडीच वर्ष राहतो. जेव्हा जेव्हा शनिदेवाचे संक्रमण होते तेव्हा शनीच्या साडेसती आणि धैय्याचा वेदनादायक काळ काही राशींसाठी सुरु होतो. सध्या शनिदेव स्वगृही कुंभ राशीत आहे. येत्या 29 मार्च 2025 ला शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशीच्या आयुष्यात संकटाचा काळ सुरु होणार आहे. 

या राशींवर साडेसती आणि धैय्या सुरू होतील

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चमध्ये शनि त्याच्या कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल, ज्याचा स्वामी गुरु आहे. तर, मकर राशीच्या लोकांना मीन राशीत प्रवेश करताच साडेसातीच्या त्रासापासून मुक्तता मिळेल. त्याच वेळी, मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीची सुरुवात होईल. मीन राशीवर साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्याचा परिणाम होईल आणि कुंभ राशीवर साडेसातीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचा परिणाम होईल.

'या' राशींवर असणार साडेसातीचा प्रभाव 

मेष रास (Aries Horoscope)

या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होणार असून या लोकांवर 7 वर्ष 2 महिने आणि तीन दिवस शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. विशेषत: करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला संकटाचा असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा नकारात्मक परिणाम असणार आहे. या राशीच्या लोकांवर तब्बल दोन वर्ष दोन महिने आणि सहा दिवसांपर्यंत शनीच्या साडेसातीचा संकटाचा काळ असणार आहे. या काळात तुम्हाला शारीरिकसह मानसिकरित्याही त्रास सहन करावे लागणार आहे. तुमच्या घरात देखील वादाची परिस्थिती असणार आहे.

मीन रास (Pisces Horoscope)

या राशीच्या लोकांवर देखील शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. या राशीच्या लोकांवर 4 वर्ष 4 महिने आणि 11 दिवसांपर्यंत शनीच्या दु्ष्परिणाम सोसावा लागणार आहे. तसंच, तुमच्या वैयक्तिक जीवनात अनेक मोठ्या घटना तुमच्याबरोबर घडणार आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ कठीण राहणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More