Marathi News> भविष्य
Advertisement

Shash Rajyog: नोव्हेंबरमध्ये शनीदेव बनवणार 'शश राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Shash Rajyog: नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

Shash Rajyog: नोव्हेंबरमध्ये शनीदेव बनवणार 'शश राजयोग'; 'या' राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Shash Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रात, एका विशिष्ट राशीमध्ये शनिदेवांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर खोलवर परिणाम करू शकते. येत्या नोव्हेंबरमध्ये शनी देव शश राजयोग हा शुभ योग तयार करणार आहेत. मुळात ज्यावेळी चंद्र, मंगळ, गुरु आणि शुक्र कुंडलीच्या अनुक्रमे 6व्या, 7व्या, 8व्या आणि 9व्या घरात येतात आणि व्यक्तीच्या समृद्धी आणि यशाचे कारक बनतात. यावेळी शश राजयोग तयार होतो. शश राजयोग अनेकदा आर्थिक विपुलता, बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुणांशी संबंधित असतो.

नोव्हेंबर महिन्यात शनी मार्गी होणार आहे. त्यामुळे शश राजयोग तयार होणार असून काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राजयोगाचा कोणत्या राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम दिसून येणार आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या शश राजयोगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या काळात शनीच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात लक्षणीय आर्थिक प्रगती होईल. जे लोक बर्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळेल. नोकरदारांसाठी वेळ नवीन संधी घेऊन येईल. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्येही नफा मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना शश राजयोगामुळे भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीचे जोरदार संकेत आहेत. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीद्वारे आर्थिक लाभ होण्याची उच्च शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती संभवते आणि व्यवसायातील रखडलेली गुंतवणूक परत येईल. वडिलोपार्जित मालमत्ता समृद्ध होईल. व्यवसायासाठी काळ शुभ राहील. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. 

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना शनीच्या शश राजयोगाचा खूप फायदा होणार आहे. व्यावसायिक संधींमुळे भरीव आर्थिक वाढ होईल. नोकरीतील बदलीमुळे कौटुंबिक आघाडीवर बढती आणि चांगली बातमी मिळू शकते. आईचा आशीर्वाद राहणार आहे. अविवाहितांसाठी काळ शुभ संधी घेऊन येईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नवीन स्रोत उघडतील. 

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शश राजयोग वरदान ठरणार आहे. या काळात शनीची त्यांच्यावर विशेष कृपा राहणार आहे. स्थावर मालमत्ता आणि वारसातून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडकलेले पैसे सुटणार आहेत. तुमच्या जोडीदाराला करिअरमध्ये प्रगतीचा अनुभव येऊ शकतो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात पती-पत्नीचे नातं अधिक घट्ट होईल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More