Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Gochar 2023: 12 दिवसांनी या राशींवर असणार शनिची वाकडी नजर, कठीण परीक्षेतून जावं लागणार

Shani Gochar 2023 जाणून घ्या तुमचीी राशी आहे का यात...

Shani Gochar 2023: 12 दिवसांनी या राशींवर असणार शनिची वाकडी नजर, कठीण परीक्षेतून जावं लागणार

Shani Gochar 2023 : नवीन वर्ष 2023 मध्ये होणाऱ्या शनि गोचरमुळे 2023 अनेक राशींचे वाईट दिवस सुरु होणार आहेत. तर काहींचे त्यांचे संकट दूर होतील तर काहींची वाईट दिवस सुरु होतील. कारण शनीची साडेसाती त्यांच्यावर राहील. दुसरीकडे शनि की धैया सुरू होईल. शनीची साडेसाती सती आणि शनीची धैय्या यामुळे या राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढणार आहेत. जरी शनीला न्याय आणि दंडाधिकारी देव मानले जाते आणि तो कर्माचे फळ देतो. याचाच अर्थ तो चांगल्या कर्मांचे चांगली फळ देतो. त्यामुळे साडे सातीच्या काळात वाईट काम करणं किंवा वाईट विचार करणं देखील टाळा.

वर्षाच्या पहिल्या महिन्यात, फक्त पंधरवड्यानंतर, शनीची चाल काही राशींसाठी नशीब उजळून देईल आणि काहींसाठी समस्या निर्माण करू शकेल. 17 जानेवारी 2023 रोजी शनी त्याची राशी कुंभ राशीत प्रवेश करेल. या राशी बदलामुळे काही राशींच्या भाग्याची गती आणि दिशा बदलेल. यामध्ये मीन राशीसाठी कठीण दिवसांचा पहिला टप्पा सुरू होईल, तर मकर आणि कुंभ राशीसाठीही साडेसाती सुरू राहील.

या काळात कोणताही वाईट विचार किंवा मग वाईट कर्म  करू नका. त्यामुळे तुमचे शनीच्या कोपापासून वाचू शकता. तर कधी म्हणतात की बऱ्याचवेळा असे केल्यानं शनी तुमची नशीब चमकवून जातो. म्हणूनच या दिवसात चांगले कर्म करा आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत राहा. याने तुमची प्रगती होईल आणि भूतकाळात केलेल्या वाईट कृत्यांचे परिणाम कमी होतील.

शनिदेव 17 जानेवारी 2023 रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करताच, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनि की धैय्याचा प्रभाव पडेल. आचार्य वार्ष्णेय यांनी सांगितले की, ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की जन्म राशीतून शनीच्या चौथ्या आणि आठव्या राशीत प्रवेश केल्यामुळे, अडीच वर्षांच्या कालावधीमुळे व्यक्तीला विशेष संघर्ष करावा लागतो.

17 जानेवारी 2023 पासून कर्क राशीसाठी आठव्या भावात शनि आणि वृश्चिक राशीच्या चौथ्या भावात गोचर असल्यामुळे या दोन राशीच्या लोकांनी अडीच वर्षे विशेष खबरदारी घ्यावी.

हे उपाय शनीचे अशुभ प्रभाव कमी करतील: आचार्य वार्ष्णेय यांच्यानुसार, शनिदेवाच्या सती आणि धैय्यादरम्यान काही उपाय करून व्यक्ती संघर्षाच्या वेदना कमी करू शकते. त्यांच्या मते अशुभ ग्रहांच्या वेदना त्यांच्या ग्रहस्थितीनुसार उपाय करून कमी करता येतात. जाणून घ्या काय उपाययोजना कराव्यात.

1. दुष्परिणामांचा त्रास कमी करण्यासाठी रोज हनुमान चालिसाचे पठण करावे.
2. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read More