Marathi News> भविष्य
Advertisement

शनीचं मकर राशीत संक्रमण, 3 राशींचं नशीब आजपासून उजळणार

करिअर-पैसा आणि बरंच काही, 3 राशींसाठी शनि गोचर ठरणार लाभदायी, पाहा तुमची रास आहे का?

शनीचं मकर राशीत संक्रमण, 3 राशींचं नशीब आजपासून उजळणार

मुंबई : शनि प्रत्येक राशीत अडीच वर्षे राहतो. आता शनी पुन्हा एकदा रास बदलणार आहे. तो कुंभ राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत शनि मकर राशीत राहील आणि नंतर तो सरळ फिरू लागेल. 

जानेवारी 2023 पर्यंत शनि मकर राशीत राहील आणि या 6 महिन्यांत 3 राशीच्या लोकांना खूप जास्त फायदा होणार आहे. शनि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम यश देईल, तसेच भरपूर पैसा देईल. चला जाणून घेऊया या काळात शनिदेव कोणत्या राशीला खूप लाभदायक ठरणार आहे.

वृषभ : या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्हाला मोठे पद मिळू शकते. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन नोकरी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे. धनलाभ होईल, उत्पन्न वाढेल. आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. कर्जातून सुटका होईल.

धनु : मोठा आर्थिक फायदा होणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. जुन्या गुंतवणुकीतूनही मजबूत परतावा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यापाऱ्यांचा नफा वाढेल. व्यवसाय वाढवण्यासाठी देखील हा चांगला काळ आहे.

मीन :  मीन राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. त्यांचे उत्पन्न वाढेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. एकूणच आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल. व्यावसायात मोठा फायदा होईल.

Read More