Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Margi 2025 : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव होणार थेट मार्गी; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, अचानक होणार आर्थिक लाभ

Shani Margi 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव नोव्हेंबर 2025 मध्ये थेट मीन राशीत मार्गी होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम तीन राशीच्या लोकांच्या आयुष्यावर होणार आहे. त्यांना अचानक धनलाभ होणार.   

Shani Margi 2025 : 30 वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव होणार थेट मार्गी; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, अचानक होणार आर्थिक लाभ

Shani Margi 2025 : ज्योतिषशास्त्रात 12 राशी, 9 ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीनुसार त्याचा मानवी जीवन, पृथ्वीतलावर नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम होतो. 9 ग्रहांपैकी पिता सूर्यदेव यांचा पुत्र आणि न्यायदेवता, कर्माचा दाता शनिदेव अतिशय महत्त्वाचा आहे. शनिदेव जाचकाला त्याचा कर्माप्रमाणे मानवला फळ देत असतो. शनिदेवाची व्रकदृष्टी ही खूप वाईट मानली जाते. मानवी जीवनाच्या आयुष्यात सर्व आलबेल राहावे यासाठी शनिदेवाला प्रसन्न ठेवणे फार गरजेचे असतं. शनिदेवाची स्थितीही अतिशय महत्त्वाची असते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा सर्वात संथ गतीने आपला मार्ग बदलत असतो. एका राशीत शनिदेव हा अडीच वर्ष वास्तवात असतो. येत्या जुलै महिन्यात शनिदेव 138 दिवस वक्री होणार आहे. त्यानंतर तो नोव्हेंबर 2025 मध्ये थेट मीन राशीत मार्गी होणार आहे. मीन राशीत शनिदेव 2027 पर्यंत असणार आहे. शनिदेवाच्या मीन मधील स्थितीनुसार 3 राशीच्या लोकांसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:20 वाजता शनि मीन राशीत थेट प्रवेश करणार आहे. गुरु ग्रह राशीत थेट असल्याने या तिन्ही राशींना भरभरून फायदा होणार आहे. (Shani Margi 2025 After 30 years Shani Dev transit these 3 zodiac signs financial gains shani margi meen)

कुंभ रास 

या राशीच्या दुसऱ्या घरात शनि थेट राहणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल परिणाम पाहिला मिळणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांचा अंत या काळात होणार आहे. यासोबतच, धैर्य आणि आत्मविश्वास वेगाने वाढणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान ठरणार आहे. पदोन्नतीसोबतच नवीन मोठ्या जबाबदाऱ्या देखील तुमच्या खांद्यावर पडणार आहे. कामावर तुमचा वेळ चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना खूप फायदे मिळणार आहे. सरकारी नोकरी मिळण्याची चांगली या काळात आहे. 

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी शनीची थेट हालचाल फलदायी सिद्ध होणार आहे. या राशीच्या तिसऱ्या घरात शनि थेट स्थित असणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. यासोबतच, कुटुंबातील सदस्यांमधील सुरू असलेली दरी संपुष्टात येणार आहे. नातेसंबंध अधिक मजबूत होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहणार आहे. या राशीखाली जन्मलेल्या लोकांचे त्यांच्या कामाचं आणि कठोर परिश्रमाचं कौतुक होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला पदोन्नतीसोबतच काही मोठी जबाबदारीही दिली जाणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर येणार आहे. 

तूळ रास

या राशीच्या लोकांसाठी शनीची थेट हालचाल अनुकूल राहणार आहे. आता, शनीच्या वक्री गतीमुळे या राशींना त्यांच्या जीवनात ज्या काही समस्या येत होत्या, त्यापासून त्यांना आराम मिळणार आहे. यासोबतच, आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कोणत्याही समस्येवर आता उपाय सापडणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा दर्जा वाढणार आहे. यासोबतच, आनंद तुमच्या आयुष्याच्या दारावर येणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. यामुळे, जमिनीवरून कुटुंबातील सुरू असलेला वाद आता संपुष्टात येणार आहे. तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे. समाजात आदर वाढणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More