Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Vakri 2023 : शनीदेवाची वक्री चाल या राशींना करणार मालामाल; जगणार राजासारखं आयुष्य

Shani Vakri 2023 : शनीच्या प्रत्येक चालीचा सर्व राशीच्या लोकांवर त्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव दीर्घकाळ राहतात. शनी 03 नोव्हेंबर 2023 पर्यंत कुंभ राशीत राहणार आहे.

Shani Vakri 2023 : शनीदेवाची वक्री चाल या राशींना करणार मालामाल; जगणार राजासारखं आयुष्य

Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. शनीच्या प्रत्येक चालीचा सर्व राशीच्या लोकांवर त्याचे शुभ आणि अशुभ प्रभाव दीर्घकाळ राहतात. शनी कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्यानंतर तो आपली राशी बदलतो. शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता मानलं जातं. शनी देव नेहमी शुभ-अशुभ कर्माच्या आधारेच फळ देतात.

30 वर्षांनंतर कुंभ राशीत शनी

शनिदेव सध्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहेत. शनी 03 नोव्हेंबर 2023 पर्यंत कुंभ राशीत राहणार आहे. जेव्हा शनि स्वतःच्या राशीत असतो आणि त्याच्या वक्री चालीमुळे सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. कुंभ राशीत वक्री असताना काही राशीच्या लोकांवर शनीचा शुभ प्रभाव दिसणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

कुंभ राशीतील शनीची वक्री गती वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. यावेळी कामात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी अनेक प्रकारच्या चांगल्या ऑफर्स येतील. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चांगली होणार आहे. तुम्ही प्रत्येक बाबतीत चांगले निर्णय घेऊ शकाल. 

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात शनी वक्रीमुळे आनंद येणार आहे. नोकरदार लोकांना चांगल्या नोकरीच्या अनेक ऑफर मिळतील. कोणत्याही व्यवसायात आहेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन गाडी खरेदी करू शकता. प्रत्येक कामात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अचानक तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळताना दिसतात. 

मकर रास

शनीच्या वक्री चालीमुळे मकर राशीच्या लोकांना फायदाच होणार आहे. कोणत्याही कामात कमी प्रयत्नात चांगलं यश मिळेल. नोकरदारांना अनेक चांगल्या ऑफर्स मिळतील. पगारात चांगली वाढ होणार आहे. कुटुंबातील काही समस्या सोडवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More