Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Margi : शनी मार्गीमुळे बनणार खास राजयोग; शनिदेवाच्या कृपेने मिळणार बक्कळ पैसा!

Shani Margi : ग्रह त्यांची स्थिती बदलतात तेव्हा अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. शनिदेव जूनमध्ये वक्री होते आणि आता येत्या नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहेत. तर आता शनी मार्गीमुळे ज्यामुळे शश महापुरुष राजयोग बनणार आहे.

Shani Margi : शनी मार्गीमुळे बनणार खास राजयोग; शनिदेवाच्या कृपेने मिळणार बक्कळ पैसा!

Shani Margi : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यावेळी ग्रह त्यांची स्थिती बदलतात तेव्हा अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. यांचा आपल्या जीवनावर होताना दिसतो. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनी देवाची विशेष भूमिका मानली जाते. येत्या सप्टेंबर रोजी शनिदेव मार्गी होणार आहेत.

 शनिदेव जूनमध्ये वक्री होते आणि आता येत्या नोव्हेंबर महिन्यात मार्गी होणार आहेत. तर आता शनी मार्गीमुळे ज्यामुळे शश महापुरुष राजयोग बनणार आहे. यामुळे या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र काही राशींना याचा चांगलाच फायदा मिळणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

कुंभ रास (Kumbh Zodiac)

शनिदेव मार्गी असल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहेत. यामुळे तुमचा आत्मविश्वास यावेळी वाढेल. तुम्ही काम करत असलेल्या क्षेत्रात अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात यश मिळू शकते. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी शश राजयोगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कौटुंबिक आनंदावर खूप सकारात्मक प्रभाव पडणार आहे.ज्यांचे लग्न झाले आहे, त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होणार आहे. कुटुंबाचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून वेळ खूप अनुकूल असेल. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

शश राजयोग तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होणार आहे. यावेळी तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला या क्षेत्रात अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो. नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More