Shravan 2025 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. धर्मशास्त्रात आठवड्यातील प्रत्यके दिवस हा विशेष देवाला समर्पित असतो. सोमवार हा महादेवाची आराधना करण्यासाठी देण्यात येतो. तर श्रावण महिना हा महादेवाला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा आणि आराधना केली जाते. अशा या श्रावण महिन्यातील सोमवारला विशेष महत्त्व असतं. श्रावणातील दर सोमवारी महादेवावर जल अर्पण करण्यात येतं. त्यासोबत प्रत्येक सोमवारी विशेष शिवामूठ अर्पण करण्यात येते. यंदा श्रावणात किती श्रावण सोमवार, कोणती शिवामूठ, किती श्रावण शुक्रवार आणि मंगळागौरीचे व्रत असणार आहे. सर्व माहिती ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून (Shravan 2025 How many Shravan Mondays and which Shivamuth offered mahadev astrology in marathi )
यंदा श्रावणात 4 श्रावणी सोमवारचं व्रत असणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा असून शिवामूठ म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक वनस्पती आणि धान्यातून एक विशेष सकारात्मक ऊर्जा आपल्या मिळत असते. शिवतत्त्वाचे पूजन करताना या वनस्पतींच्या माध्यमातून नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार शिवामूठ वाहिल्याने दोष दूर होण्यास फायदा होतो. आरोग्य लाभतो, कर्जमुक्ती होते, आणि शांती आणि समृद्धी प्राप्त होते.
पहिला सोमवार – 28 जुलै 2025 – शिवामूठ – तांदूळ
दुसरा सोमवार – 4 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – तीळ
तिसरा सोमवार – 11 ऑगस्ट 2025 शिवामूठ – मूग
चौथा सोमवार – 18 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – जव
शिवामूठ वाहताना “ॐ नमः शिवाय” या मंत्राचा जप केला पाहिजे.
यंदा श्रावणातील मंगळागौरी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण यंदा मंगळगौरीच्या व्रतासह दुहेरी योग जुळून आला आहे.
पहिला मंगळवार - 29 जुलै 2025 - नागपंचमी
दुसरा मंगळवार - 5 ऑगस्ट 2025 - पुत्रदा एकादशी
तिसरा मंगळवार - 12 ऑगस्ट 2025 - अंगारक संकष्ट चतुर्थी
चौथा मंगळवार - 19 ऑगस्ट 2025 - अजा एकादशी
पहिला शुक्रवार - 25 जुलै 2025
दुसरा शुक्रवार - 1 ऑगस्ट 2025
तिसरा शुक्रवार - 8 ऑगस्ट 2025 - नारळी पौर्णिमा
चौथा शुक्रवार - 15 ऑगस्ट 2025 - श्रीकृष्ण जयंती
पाचवा शुक्रवार - 22 ऑगस्ट 2025 - पोळा
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)