Marathi News> भविष्य
Advertisement

'या' मूलांकांसाठी श्रावण महिना ठरणार अत्यंत शुभ, जाणून घ्या उपाय आणि लाभ

श्रावण महिना हा भगवान शंकर यांना समर्पित आहे. या श्रावण सोमवारी या मूलांक असणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. जाणून घ्या सविस्तर 

'या' मूलांकांसाठी श्रावण महिना ठरणार अत्यंत शुभ, जाणून घ्या उपाय आणि लाभ

Sawan Somwar 2025: श्रावण महिना भगवान शंकराची पूजा-अर्चा करण्यासाठी शुभ मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला एक विशेष महत्त्व असतं. ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो. अंकज्योतिषानुसार काही विशिष्ट मूलांकांसाठी श्रावण सोमवार विशेष फलदायी ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या मूलांकला होणार फायदा. 

मूलांक 1
 
ज्या व्यक्तीचा मूलांक 1 असतो अशा व्यक्तींसाठी श्रावण महिना नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे. या महिन्यात सोमवारच्या दिवशी महादेवाला अभिषेक केल्याने कार्यक्षेत्रात यश मिळेल.

लाभ: करिअरमध्ये प्रगती, मान-सन्मानात वाढेल आणि आर्थिक लाभ मिळेल.

उपाय: शिवलिंगावर जल आणि लाल चंदन अर्पण करा.

मूलांक 3

ज्या व्यक्तीचा मूलांक 3 आहे त्यांच्यासाठी श्रावण सोमवार ज्ञान आणि समृद्धी घेऊन येतो. म्हणून या काळात भोलेनाथाची विधीपूर्वक पूजा करा.

लाभ: शिक्षण, व्यवसाय आणि वैयक्तिक कामांमध्ये यश मिळेल. तसेच अडलेली कामं मार्गी लागतील.

उपाय: शिवलिंगावर दूध आणि केशर अर्पण करा.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या व्यक्तीसाठी श्रावण सोमवार व्यावसायिक यश घेऊन येणार आहे. मात्र, त्यांनी शिव-पार्वतीची एकत्रित पूजा करावी असा सल्ला देण्यात आला आहे.

लाभ: व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि प्रवासातून लाभ मिळेल.

उपाय: शिवलिंगावर बेलपत्र आणि गंगाजल अर्पण करा आणि 'ॐ नमः शिवाय' मंत्र 108 वेळा जपा.

मूलांक 9

मूलांक 9 हा मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येणार असून तो लोकांसाठी श्रावण सोमवारी ऊर्जा आणि धैर्य वाढवणारा ठरेल. या लोकांना शिव परिवाराची विशेष पूजा करण्याचा सल्ला दिला गेला आहे. 

लाभ: शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. तसेच स्पर्धा परीक्षा आणि करिअरमध्ये यश मिळेल.

उपाय: शिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक करा.

टीप : श्रावण महिन्यात आपल्या मूलांकानुसार भगवान शंकराची पूजा केल्यास शुभ आशीर्वाद मिळू शकतो. तसेच योग्य उपाय केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read More