Marathi News> भविष्य
Advertisement

24 तासानंतर शुक्र करणार मिथुन राशीत प्रवेश, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

शनि ग्रहाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र ग्रह आता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

24 तासानंतर शुक्र करणार मिथुन राशीत प्रवेश, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

Shukra Gochar Effect on Zodiac Signs: शनि ग्रहाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर शुक्र ग्रह आता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह 24 तासानंतर म्हणजेच 13 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध मिथुन राशीत असून शुक्र देखील मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीमध्ये बुध, शुक्र आणि सूर्य यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होईल. हा योग सर्व राशींवर प्रभाव टाकेल परंतु विशेषतः 3 राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. त्रिग्रही योग लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, पदोन्नती आणि पैसा देईल.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योग खूप लाभ देईल. विशेषत: पैशाशी संबंधित प्रकरणे सुटतील. अचानक पैसे मिळतील. आतापर्यंत थकीत असलेले पैसेही मिळतील. एकूणच, अनेक मार्गांनी मिळालेल्या पैशामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्न वाढू शकते. जे लोक मीडिया, फिल्म इंडस्ट्री किंवा मार्केटिंगशी संबंधित आहेत, त्यांना नवीन संधी मिळू शकते. या काळात उत्पन्न, आदर वाढेल. व्यावसायिकांनाही नफा कमावण्याची संधी मिळेल.

सिंह : त्रिग्रही योगामुळे सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवीन मार्गाने पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअर-व्यवसायात प्रगती होऊ शकते. सन्मान-पुरस्कार मिळू शकतो. खर्च नियंत्रणात ठेवल्याने बचत करता येईल.

कन्या : कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. मिथुन राशीतील त्रिग्रही योगामुळे प्रगती होईल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. ज्यांचे काम परदेशाशी संबंधित आहे, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. एकंदरीत हा काळ कामाच्या आणि पैशाच्या दृष्टीने खूप चांगला आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याला ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More