Marathi News> भविष्य
Advertisement

Shukra Gochar : 12 महिन्यांनंतर शुक्र स्वगृही, 'या' राशींचं नशीब चमकणार

Shukra Gochar In Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. संपत्तीचा कारक शुक्रदेव तब्बल 1 वर्षांनी स्वगृही म्हणजे वृषभ राशीत गोचर करणार आहे. 

Shukra Gochar : 12 महिन्यांनंतर शुक्र स्वगृही, 'या' राशींचं नशीब चमकणार

Shukra Gochar In Taurus : वैदिक ज्योतिषशास्त्र हे ग्रह आणि नक्षत्राच्या अभ्यास करुन त्याचा परिणाम पृथ्वीवर आणि मानवी जीवना कसा होतो याचा अभ्यास करतात. ग्रह हे एका ठराविक वेळे नंतर आपले स्थान बदलतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. विलास, संपत्ती, भौतिक सुख आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र सध्या मेष राशीत आहे. तब्बल 1 वर्षांनी शुक्रदेव मेष राशीतून स्वगृही वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मे महिन्यात शुक्र गोचर करणार आहे. याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर चांगला वाईट होणार आहे. पण 12 राशींपैकी 3 राशींना मात्र शुक्र गोचरमुळे फायद्याच फायदा होणार आहे. कुठल्या राशी आहेत त्या आणि त्यांना काय लाभ होणार आहे, पाहूयात. (Shukra Gochar After 12 months Venus In Taurus the fortune of  this zodiac sign will shine)

मेष रास (Aries Zodiac)  

शुक्र गोचर या साठीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. शुक्र गोचर या राशीच्या कुंडलीतील धन आणि वाणीच्या घरात होणार असल्याने वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमचे अकडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला लाभ होणार आहे. तर नोकरदारांना पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. याशिवाय तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सुधारणा होणार आहे. व्यापाऱ्यांनी घेतलेले कर्ज त्यांच्या डोक्यावरुन उतरणार आहे. 

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर फायदेशीर ठरणार आहे. कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत शुक्र उत्पन्न आणि लाभाच्या घरात होणार आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. तसंच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होणार आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात पूर्वीपेक्षा सुधारणार आहे. शुक्र गोचरमुळे समाजात तुमचा सन्मान वाढणार आहे. पालकांना मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. 

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)   

शुक्र ग्रह तुमच्या राशीच्या 12 व्या घराचा स्वामी असल्याने शुक्र गोचर या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीत सातव्या घरात गोचर करणार आहे. तर विवाहित लोकांच्या आयुष्यात अद्भूत बदल दिसणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही सहकार्य लाभणार आहे. तुमच्या जोडीदाराची प्रगती तुमच्यासाठीही चांगली ठरणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या लोकांची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Read More